कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नने एक अनोखा निर्णय घेतला आहे. वॉर्नने आपल्या कंपनीमध्ये दारूऐवजी सॅनिटायजर बनवत आहे. यापूर्वी तो ‘जिन’ (दारूचा एक प्रकार) बनवत होता.
जगभरातील २ लाखांपेक्षा अधिक लोकांना कोरोना व्हायरसची (Corona Virus) लागण झाली आहे. तर तब्बल ९ हजार लोकांना यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. सुरक्षितता लक्षात घेता सॅनिटायजर खूप महत्त्वाचे आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये या सॅनिटायजरची कमतरता जाणवत आहे.
त्यामुळे वॉर्नची (Shane Warne) कंपनी ‘७०८ जिन’ने १७ मार्चपासून वैद्यकीय प्रमाण असलेल्या ७० टक्के अल्कोहोलयुक्त सॅनिटायजर (Sanitiser) बनवण्यास सुरुवात केली आहे. या सॅनिटायजरचा वापर ऑस्ट्रेलियातील २ रुग्णालयांमध्ये केला जाणार आहे.
वॉर्नने सांगितले की, “ऑस्ट्रेलियातील (Australia) लोकांसाठी सध्या आव्हानात्मक परिस्थिती आहे. त्यामुळे या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी आणि लोकांना वाचवण्यासाठी आपण आपल्या आरोग्य सेवा सुविधांची मदत केली पाहिजे. त्यासाठी ते सर्व करावे लागेल जे आपण करू शकतो.”
“मला आनंंद होत आहे की, ‘७०८ जिन’ (708 GIN) कंपनी असा बदल करू शकते आणि इतरांनाही प्रेरित करू शकते. ऑस्ट्रेलियामध्ये आतापर्यंत ५६५ लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. तर ६ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे,” असे वॉर्न म्हणाला.
“वाढत्या प्रकरणांमुळे ऑस्ट्रेलियातील काही भागात हॅण्ड सॅनिटायजरची मागणी वाढली आहे. त्यामुळे हे विकत घेण्यासाठी लोकांची तारांबळ उडत आहे.” असेही वॉर्न यावेळी म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-रणजी ट्राॅफीच्या फायनलमधील वाद शिगेला, बंगालच्या संघ या कारणाने वैतागला
-१२ पैकी १२ आयपीएलमध्ये सुरेश रैनाने धावांचा असा पाडला आहे पाऊस
-एकाचवेळी विरासह ७ खेळाडूंनी ट्विट करण्याचे कारणंही आहे तसंच मोठं