---Advertisement---

या ५ गोलंदाजांचा टी२०मध्ये नादच खुळा! वॉटसनही झालाय यांचाच दिवाना

---Advertisement---

ऑस्ट्रेलियायाचा माजी क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर शेन वॉटसनने टी२० क्रिकेटमधील 5 सर्वोत्कृष्ट गोलंदाजांची निवड केली आहे. त्याने निवडलेल्या या 5 गोलंदाजांबद्दल क्रिकेटप्रेमींचं काय मत आहे असेही त्याने ट्विटर विचारले आहे.

त्याने निवडलेल्या 5 गोलंदाजांमध्ये भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा समावेश आहे. बुमराह व्यतिरिक्त श्रीलंकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा, वेस्टइंडिज संघाचा अष्टपैलू ड्वेन ब्रावो, फिरकीपटू सुनील नरेन, पाकिस्तानचा माजी अष्टपैलू शाहिद आफ्रिदी यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे शेन वॉटसनने नाव घेतलेल्या पाचही गोलंदाजांनी टी२० क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.

 

39 वर्षीय शेन वॉटसनने कारकीर्दीत 59 कसोटी, 190 वनडे आणि 58 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 3731 धावा केल्या असून 75 बळीही घेतले आहे. वनडे सामन्यात त्याने 5757 धावा केल्या आहेत आणि 168 बळी घेतले आहेत. आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात त्याने 1462 धावा केल्या आहेत आणि 48 बळी घेतले आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 337 टी20 सामन्यांत 8657 धावा केल्या आहेत आणि एकूण 216 बळी घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---