ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्ग्ज अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन (Shane Watson) याने भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि दिग्गज विराट कोहली (Virat Kohli) यांच्या गुणवत्तेची तुलना केली आहे. त्याने विराटला एक सुपर ह्यूमन आणि एमएस धोनीच्या नसांमध्ये बर्फ पळते, असे सांगितेल आहे. वॉटसन आयपीएलमध्ये धोनी आणि विराट या दोघांच्या नेतृत्वात खेळलेला आहे, त्यामुळे या दोघांची गुणवत्ता चांगल्या प्रकारे माहिती आहे.
वॉटसन म्हणाला की, “विराटने एका कर्णधाराच्या रूपात अविश्वसनीय कामगिरी केली आहे. ज्याप्रकारे तो खेळाडूंना पुढे घेऊन जाण्यात यशस्वी ठरला आहे, त्याला स्वतःकडूनही तेवढीच मोठी अपेक्षा आहे आणि तो स्वतःच्या खेळात हे उतरवण्याचा प्रयत्नही करतो. माझ्यासाठी विराट सुपर ह्यूमन आहे. त्याला माहिती आहे की, त्याच्या आसपासच्या खेळाडूंना पुढे कसे न्यायचे. विराट एक चांगला व्यक्ती आहे, तो मैदानाबाहेर एक चांगले समतोल राखणारा खेळाडू आहे. त्याच्याकडे ज्ञान आकर्षक आहे. आरसीबीमध्ये विराटसोबत काम करणे माझ्यासाठी अप्रतिम अनुभव होता.”
शेन वॉटसनच्या मते माजी कर्णधार एमएस धोनी नेहमी शांत असतो. तो म्हणाला की, “एमएस धोनी एवढा शांत राहायचा की, असे वाटायचे की, त्याच्या नसांमध्ये बर्फ वाहत आहे. त्याच्याकडे संघाच्या वातावरणातून दबाव दूर करण्याची क्षमता आहे, त्याला स्वतःच्या खेळाडूंवर विश्वास आहे. तो सुनिश्चित करतो की, सर्वांना स्वतःच्या क्षमतांवर विश्वास असावा. त्याला माहिती आहे की, त्याचे आणि त्याच्या आसपासच्या खेळाडूंचे काय काम आहे. तो मैदानात स्वतःच्या अंत:प्रेरणेवर विश्वास ठेवतो. त्याला विश्वास आहे की, खेळाडू स्वतःचा शोध घेतली आणि मैदानावर जे गरजेचे आहे, ते करतील.”
वॉटसन यावेळी भारताचा नवनियुक्त कर्णधार रोहित शर्माविषयीही बोलला आहे. तो म्हणाला की, “तो खूपच नैसर्गिक आणि साधा लीडर आहे. मी त्याला मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना पाहिले आहे आणि त्याला कोणतीच गोष्ट विचलित करू शकत नाही. तो स्वतःचे काम अविश्वसनीय आणि चांगल्या प्रकारे पार पाडतो. खूप दबावात मुंबई (इंडियन्स) सारख्या संघाचे नेतृत्व करतो, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खूप अपेक्षा असतात.”
महत्वाच्या बातम्या –
‘बुमराहदेखील आहे, त्याला विसरू नका’, गावसकरांची भारतीय वेगवान आक्रमणाबद्दल मोठी प्रतिक्रिया