दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेला आयपीएल २०२२मधील ३४वा सामना खूपच चर्चेत राहिला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २२२ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली संघाला २०७ धावाच करता आल्या आणि त्यांनी १५ धावांनी हा सामना गमावला. या सामन्यादरम्यान दिल्लीचे खेळाडू फारच तापलेले दिसले. त्यातही दिल्लीच्या डावातील शेवटच्या षटकादरम्यान नाट्यमय प्रसंग घडला. आता या प्रसंगाबद्दल दिल्लीचा साहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसन याने प्रतिक्रिया दिली आहे.
या प्रकरणी (No Ball Controversy) वॉटसन सामन्यानंतर म्हणाला (Shane Watson On No Ball Controversy) की, “त्या षटकात जे घडले ते खूप निराशादायी होते. दिल्लीच्या शेवटच्या षटकात जे काही घडले, मी त्याचे समर्थन करत नाही. पंचांनी निर्णय दिला, मग तो चूक असो वा बरोबर, आपल्याला त्यांचा निर्णय मान्य करावा लागतो आणि खेळ पुढे न्यावा लागतो. मी पंतशी तेच बोलत होतो. आपल्याला पूर्वीपासूनच शिकवले जाते की, पंचांच्या निर्णयाला मान्य केले पाहिजे आणि आम्हीही तेच करायला पाहिजे होते. कोणाचे भर सामन्यातून मैदानाबाहेर जाणे, हे स्विकाहार्य नाही. एकूणच जे काही झाले, ते योग्य नव्हते.”
वॉटसनला (Shane Watson) विचारले गेले की, “शेवटच्या षटकात घडलेल्या नो बॉल प्रकरणामुळे दिल्ली संघाची लय बिघडली का या प्रश्नाचे उत्तर देताना वॉटसन म्हणाला की, ज्याप्रकारे सामन्याचा शेवट झाला, त्याला पाहून असे वाटते की, जेव्हाही खेळामध्ये अडथळा निर्माण होतो, तेव्हा लय बिघडू शकते. परंतु यामुळे राजस्थानचा गोलंदाज ओबेय मॅकॉयला लय परत मिळवण्याची संधी मिळाली. हा अडथळा राजस्थानसाठी फायदेशीर ठरला. हा अडथळा दुर्दैवी होता.”
हेही वाचा- DC vs RR। वातावरण इतकं तापलं तरीही तिसऱ्या पंचांकडे का गेला नाही निर्णय? जाणून घ्या एका क्लिकवर
नक्की काय घडले शेवटच्या षटकात
विजयासाठी शेवटच्या षटकात दिल्लीला ३६ धावांची आवश्यकता होती. राजस्थानचा ओबेद मॅककॉय गोलंदाजीसाठी आला, तर स्ट्राईकवर फलंदाजीसाठी रोवमन पॉवेल होता. षटकातील सुरुवातीचे तिन्ही चेंडूवर पॉवेलने षटकार ठोकले आणि संघाला विजयाची आशा निर्माण झाली. यादरम्यान मॅककॉयने टाकलेल्या तिसऱ्या चेंडूमुळे हा वाद झाला. त्याने हा चेंडू फुलटॉस घेकला होता आणि तो नो बॉल असू शकत होता. परंतु पंचाने त्याला नो बॉल करार दिला नाही. याच कारणास्तव कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) चांगलाच संतापला आणि त्याने खेळपट्टीवरील त्यांच्या फलंदाजांना मैदान सोडण्याचा इशारा देखील दिला.
दिल्लीच्या डग आऊटमधून नो बॉलची मागणी केली जात होती, पण पंचांनी तिसऱ्या पंचाकडे विचारणा न करता निर्णय दिला. त्यावेळी जोस बटलर सीमारेषेच्या जवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा होता आणि त्याने पंतला समजवण्याचा प्रयत्न केला. तसेच, दिल्लीचा प्रशिक्षक शेन वॉटसनने देखील पंतला समज दिली. त्यानंतर संघाचे प्रशिक्षक प्रवीण आमरे मैदानात धावत गेले आणि त्यांचा संघ खेळण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. पॉवेल सुरुवातीला चांगल्या फॉर्ममध्ये होता, पण या वादानंतरच्या तीन चेंडूवर त्याला कमाल करता आली नाही. शेवटच्या तीन चेंडूवर त्याने अवघ्या २ धावा केल्या. परिणामी दिल्लीला १५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या-
DC vs RR। वातावरण इतकं तापलं तरीही तिसऱ्या पंचांकडे का गेला नाही निर्णय? जाणून घ्या एका क्लिकवर
डेविड वॉर्नरने हद्दच पार केली! आऊट झाल्यानंतर केली अशी कृती, Video पाहून घ्या समजून
तिकडे नो बॉलचा वाद सुरू होता अन् इकडे कुलदीपलाच भिडला चहल; Video जोरदार व्हायरल