क्रिकेटच्या सर्वात लहान फाॅरमॅट म्हणजेच टी20 मध्ये एकापेक्षा एक लांबलचक षटकार मारताना तुम्ही पाहिले असेलच. अनेक वेळा फलंदाज आपली सर्व शक्ती वापरत चेंडू स्टेडियमच्या बाहेर देखील मारतो. आता तसाच एका सिक्सचा व्हिडिओ दाखवणार आहोत. जो की कॅरेबियन प्रीमियर लीग 2024 दरम्यान त्रिनबागो नाइट रायडर्सचा सलामीचा फलंदाज शकेरे पॅरिसने 124 मीटर लांब षटकार मारून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. हा टी20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लांब षटकारांपैकी एक आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सामन्याच्या तिसऱ्या षटकात गुडाकेश मोतीच्या चेंडूवर शकरे पॅरिसने हा षटकार ठोकला. मोतीने पॅरिसच्या स्लॉटमध्ये चेंडू दिला आणि या फलंदाजाने कॅरेबियन ताकद दाखवत आपल्या शक्तीचा पुरेपूर वापर करून चेंडू मिड-विकेट आणि लाँग-ऑनमध्ये सीमारेषेबाहेर हाणला. मात्र चेंडू स्टेडियमच्या बाहेर जाण्यापासून थोडक्यात वाचला.
शकरे पॅरिसने मारलेल्या या षटकाराने त्याचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. पण या सामन्यात तो आपल्या संघासाठी मोठी खेळी खेळू शकला नाही. 149 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने 29 चेंडूंत 2 चौकार आणि तब्बल 2 षटकारांच्या मदतीने 29 धावा केल्या.
पाहा व्हिडिओ-
124 metres!!! You have to be joking Shaqkere Parris🤯#CPL #TKRvGAW #BiggestPartyInSport #CricketPlayedLouder #CaribbeanAirlines @iflycaribbean pic.twitter.com/ev72KN13H7
— CPL T20 (@CPL) September 19, 2024
सामन्याबद्दल बोलायचे तर सीपीएल 2024 चा 19 वा सामना त्रिनबागो नाइट रायडर्स आणि गयाना ॲमेझॉन वॉरियर्स यांच्यात खेळला गेला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर गयाना संघाने निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 148 धावा केल्या. टीकेआर संघाने ही धावसंख्या 19.2 षटकात 5 विकेट्स शिल्लक असताना गाठली. आंद्रे रसेलने 15 चेंडूत 240 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 35 धावा केल्या, तर टीम डेव्हिडने 31 धावांची खेळी केली.
हेही वाचा-
ind vs ban: बांग्लादेशचा टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; पाहा प्लेइंग इलेव्हन
कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारे टाॅप-5 खेळाडू
अफगाणिस्तानने आफ्रिकेचा पराभव केला; पण टीम इंडियाच्या नावावर जमा झाला हा अनोखा विक्रम!