देशातील सर्वात मोठी व सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनची (एमसीए) निवडणूक (MCA Election) जवळ येऊ लागली आहे. 20 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष व भाजप आमदार आशिष शेलार यांच्याविरुद्ध माजी अध्यक्ष शरद पवार यांचे गट समोरासमोर येणार अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी एक वेगळे चित्र पाहायला मिळाले.
शरद पवार गट व आशिष शेलार गट हेच एकमेकाविरुद्ध लढण्याची तयारी झाली असताना आता मोठी बातमी समोर येतेय. पवार व शेलार गट यांनी एकत्रित पॅनल उभे करत आशिष शेलार यांना अध्यक्षपदाचे उमेदवार घोषित केले आहे. सोमवारी (10 ऑक्टोबर) नेहरू हॉल येथे झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. तसेच स्वतंत्र लढू इच्छिणारे शरद पवार यांचे निकटवर्तीय आमदार जितेंद्र आव्हाड तसेच शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी देखील शेलार यांना पाठिंबा दर्शविला आहे.
शरद पवार यांच्याकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे यापूर्वी त्यांच्या गटाकडून उमेदवारी अर्ज भरलेल्या माजी क्रिकेटपटू संदीप पाटील व कार्यकारणीच्या इतर सभासदांचे भवितव्य अधांतरी दिसत आहे. त्यावेळी सचिव पदासाठी अर्ज भरलेल्या अजिंक्य नाईक यांनी शेलार-पवार संयुक्त गटातर्फे देखील अर्ज दाखल केला आहे. तर, उपाध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानल्या जाणाऱ्या अमोल काळे यांना संधी दिली गेली आहे.
भारतीय क्रिकेट जगताचे लक्ष लागलेली ही त्रैवार्षिक निवडणूक 28 सप्टेंबर रोजी होणार होती. मात्र, आता ही निवडणूक 20 ऑक्टोबर रोजी पार पडेल. निवडणुकीसाठी मतदार करणाऱ्या मतदारांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हिला डाला ना! मैदान तर गाजवलंच, आता ‘माही भाईं’चा डोळा फिल्म इंडस्ट्रीवर; सुरू केलं प्रोडक्शन हाऊस
मूर्ती लहान, कीर्ती महान! इशानने 24 वर्षांच्या वयात केला ‘हा’ पराक्रम, ‘माही भाई’ टेबल टॉपर