---Advertisement---

साहेबांनी थोपटली पाठ! एजाजच्या पराक्रमाची शरद पवारांकडूनही दखल, मोजकेच शब्द पण पोटभर कौतुक

On: रविवार, डिसेंबर 5, 2021 9:31 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील मुंबई येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसरा दिवस (०४ डिसेंबर) न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेल याने गाजवला. त्याने या दिवशी भारताच्या दहाच्या दहा फलंदाजांना बाद करत इतिहासाला गवसणी घातली. यासह तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात १० विकेट्स घेणारा केवळ तिसराच गोलंदाज बनला आहे. यानंतर सोशल मीडियावर त्याचे कौतुक करणाऱ्या ट्वीट्सचा वर्षाव होतो आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे माजी अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनीदेखील या कामगिरीबद्दल एजाजचे कौतुक केले.

एजाजने केली ऐतिहासिक कामगिरी
मुंबई कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचे चार गडी बाद झाले होते. हे चारही गडी फिरकीपटू एजाज पटेलने टिपलेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील त्याने भारतीय संघाचे उर्वरित सहा गडी बाद करत सर्वच्या सर्व दहा गडी बाद करण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. यापूर्वी अशी कामगिरी इंग्लंडचे जिम लेकर व भारताच्या अनिल कुंबळे यांनी केली होती. विशेष म्हणजे एजाज हा मूळचा मुंबईकर असून, तो न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करतो. तो आपल्या कुटुंबासह वयाच्या आठव्या वर्षी न्यूझीलंड येथे स्थायिक झाला होता.

शरद पवारांनी केले कौतुक
एजाजच्या या कामगिरीची चर्चा सगळीकडे होत असताना, आजी-माजी क्रिकेटपटूंसह चाहते त्याचे कौतुक करत आहेत. आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील त्याचे कौतुक केले.

त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत लिहिले, ‘कसोटीत एकाच डावात दहा बळी मिळवण्याची शानदार कामगिरी केल्याबद्दल एजाज पटेलचे अभिनंदन. मुंबईत जन्मलेला आणि न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करत असताना अभिमानास्पद कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा केवळ तिसरा क्रिकेटपटू.’

शरद पवार यांनी या सामन्याच्या पहिल्या दिवशी सामन्याचा आनंद लुटला होता. यावेळी त्यांच्यासह महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर उपस्थित होत्या. पवार यांनी यापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपद भूषवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

एजाजच्या अभिनंदनासाठी गुरु द्रविडसह ‘टीम इंडिया’ न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये

हर्षलने ‘या दिग्गजाला दिले आपल्या ‘झकास’ कामगिरीचे श्रेय; म्हणाला…

‘दस का दम’ दाखवूनही एजाज नंबर दोनच; भारतीय दिग्गज टॉपला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---