---Advertisement---

.. अन्‌ क्रिकेटवर मनापासून प्रेम करणाऱ्या शरद पवार यांनी भारतीय संघाला दिल्या आभाळभर शुभेच्छा, पहा ट्विट 

On: मंगळवार, जानेवारी 19, 2021 7:25 PM
---Advertisement---

गाबा येथे मंगळवारी(19 डिसेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चौथा कसोटी पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाला 328 धावांचे लक्ष्य दिले होते. भारतीय संघाने या आव्हानाचा पाठलाग करताना 96.6 षटकांत 7 गडी गमावून 329 धावा काढत पूर्ण केले. त्यामुळे भारतीय संघाने चार सामन्याची बॉर्डर गावसकर मालिका 2-1 या फरकाने जिंकली. त्यामुळे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार सोशल मीडियावरून भारतीय संघाचे कौतुक केले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी सामन्यांची बॉर्डर गावसकर मालिका पार पडली. या मालिकेतील गाबा येथील सामना जिंकत भारतीय संघाने मालिका आपल्या नावावर केली. त्याचबरोबर भारतीय संघाने गाबा येथे तब्बल 32 वर्षानी पहिला विजय नोंदवला. त्यामुळे भारतीय संघासाठी हा विजय दोन कारणांनी ऐतिहासिक ठरला. एक म्हणजे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात दुसर्‍यांदा मालिका जिंकली. दुसरे 32 वर्षानंतर गाबाच्या मैदानावर एखाद्या संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवण्यात यश मिळाले. त्यामुळे भारतीय संघावर या ऐतिहासिक विजयानंतर माजी आयसीसी अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय संघाला शुभेच्या दिल्या आहेत.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी ट्विट करतांना लिहले की, “ऑस्ट्रेलिया संघावर मिळवलेल्या विजयासाठी भारतीय संघाचे अभिनंदन. भारतीय क्रिकेटसाठी आजचा विजय निश्चितचं ऐतिहासिक आहे. ब्रिस्बेनमध्ये 32 वर्षांनी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर गाबा येथे विजय मिळवला. वेल डन.”

चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाकडून शुबमन गिलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 146 चेंडूचा सामना करताना 8 चौकार आणि 2 षटकार खेचत 91 धावांची खेळी साकारली. तसेच रिषभ पंतने 138 चेंडूचा सामना करताना 9 चौकार आणि 1 गगनचुंबी षटकार ठोकत नाबाद 89 धावांची खेळी केली. त्याचबरोबर चेतेश्वर पुजाराने 211 चेंडूचा सामना करताना 7 चौकार ठोकत 56 धावांची खेळी केली.

ऑस्ट्रेलिया संघाकडून गोलंदाजी करताना पॅट कमिन्सने सर्वाधिक जास्त विकेट्स घेतल्या. त्याने 24 षटके गोलंदाजी करताना 55 धावा खर्च करून 4 गडी बाद केले. त्यांनंतर नॅथन लायनने 31 षटके गोलंदाजी करताना 85 धावा देवून 2 गडी बाद केले. त्याचबरोबर जोश हेझलवूडने 22 षटके गोलंदाजी करताना 74 धावा देताना 1 गडी बाद केला.

महत्त्वाच्या बातम्या –

भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहली खुश! ‘असे’ ट्विट करत केले अभिनंदन

एक घाव अन् दोन तुकडे! भारताने आत्तापर्यंत बलाढ्य समजल्या जाणाऱ्या ऑसी संघांचे ‘एवढे’ विश्वविक्रम केलेत खंडित

‘मार बसला तरी आपण नेटाने उभा राहिलो’, क्रिकेटच्या देवाकडून संघाचं खास शब्दात कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---