भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना मंगळवारी (8 डिसेंबर) सिडनी झाला. या सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांनी अतिशय खराब कामगिरी केली. सुमार क्षेत्ररक्षणाचा फटका संघाला बसला आणि ऑस्ट्रेलियाने 186 ही विशाल धावसंख्या गाठली. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या 17 व्या षटकात भारतीय क्षेत्ररक्षक दीपक चाहरने ऑस्ट्रेलियाचा आक्रमक अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याचा झेल सोडला. त्यामुळे गोलंदाजी करत असलेल्या शार्दूल ठाकूरला राग अनावर झाला आणि तो अपशब्दांचा वापर करताना दिसला.
दीपक चाहरच्या हाताला लागून चेंडू पडला खाली
मॅक्सवेल आक्रमक शैलीत फलंदाजी करत होता. त्याने 27 चेंडूत 40 धावांवर खेळत होता. त्याचदरम्यान डावाच्या 17 व्या षटकांत वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर गोलंदाजी करायला आला. षटकाच्या पाचव्या चेंडूवर मॅक्सवेलने डीप बॅकवर्ड पॉईंटवर फटका मारला. चेंडू हवेत उंच गेला. दीपक चाहर झेल घेण्याच्या इराद्याने धावत आला. मात्र, चेंडू त्याच्या दोन्ही हाताला लागून खाली पडला.
शार्दुल अपशब्दांचा वापर करताना कॅमेरात झाला कैद
ऑस्ट्रेलियाला कमी धावसंख्येवर रोखण्याच्या दृष्टीने हा झेल घेणे अतिशय महत्त्वाचे होते. मात्र, दीपक चाहर झेल टिपण्यास अपयशी ठरल्यामुळे शार्दुल चांगलाच भडकला. रागाच्या भरात त्याने अपशब्दांचा वापर केला आणि तो कॅमेरात कैद झाला.
https://twitter.com/Satyan_beshi/status/1336245179464908801?s=20
https://twitter.com/CricketMemes718/status/1334070798185689089
ऑस्ट्रेलियाने दिले 187 धावांचे लक्ष्य
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाला 187 धावांचे विशाल लक्ष्य दिले.
भारतीय संघाचा 12 धावांनी पराभव
प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर केएल राहुल शून्यावर बाद झाला. भारताचे फलंदाज नियमित अंतराने बाद होते. मात्र कर्णधार विराट कोहली खेळपट्टीवर टिकून होता. अखेरच्या काही षटकांत अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि विराटने फटकेबाजी करत सामना जिंकवून देण्याचा प्रयत्न केल. मात्र, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना या दोघांनाही बाद करण्यात यश आलं. यावेळी विराटने 85 आणि पंड्याने 20 धावांचे योगदान दिले.
भारतीय संघाला 20 षटकांत 174 धावाच करता आल्या त्यामुळे भारताचा संघाचा 12 धावांनी पराभव झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हम तो उड गए’, पॅरासिलिंग करतानाचा व्हिडिओ केला सचिनने शेअर
धडकी भरवणारा क्षण! कार्तिक त्यागीचा चेंडू लागला पुकोवस्कीच्या डोक्याला, अन् पुढे काय झालं पाहाच…
VIDEO: ऑस्ट्रेलियाच्या नवोदित अष्टपैलूचा दणका; शतकी खेळीनंतर ‘पृथ्वी शॉ’ला केले सापळा रचून बाद
ट्रेंडिंग लेख-
अरेरे! क्रिकेट जगतावर राज्य करूनही कधीच रणजी ट्रॉफी न जिंकलेले ४ भारतीय दिग्गज
टीम इंडियाचे ३ धडाकेबाज गोलंदाज, ज्यांनी केली २०२० मध्ये वनडेत सर्वोत्तम कामगिरी
टॉप ३: २०२० मध्ये वनडेत सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे भारतीय शिलेदार; अव्वलस्थानी ‘हा’ खेळाडू