भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज अष्टपैलू शार्दुल ठाकूर सध्या इराणी कप 2024 मध्ये मुंबईकडून खेळत आहे. लखनऊमध्ये खेळल्या जात असलेल्या इराणी कपच्या सामन्यात दुसऱ्या दिवशी शार्दुल फलंदाजीला आला होता. वृत्तानुसार, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर लगेचच शार्दुलला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, शार्दुलला खूप ताप आला होता. त्यामुळे त्याला लखनऊच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करावे लागले. सामन्याच्या पहिल्या दिवशी शार्दुलला सौम्य ताप होता. तोच दुसऱ्या दिवशी लक्षणीयरीत्या वाढला. असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र, असे असतानाही शार्दुल फलंदाजीसाठी मैदानात आला आणि त्याने 36 धावांची खेळीही खेळली.
इंडियन एक्स्प्रेसने एका सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, “दिवसभर त्याला बरे वाटत नव्हते आणि त्याला खूप ताप होता. त्यामुळे तो फलंदाजीला उशीरा आला. त्याला अशक्तपणा जाणवत होता आणि नंतर त्याला ड्रेसिंगमध्ये झोपावे लागले.” त्याला अशक्तपणा असताना देखील खेळायचे होते. मलेरिया आणि डेंग्यूसाठी त्याची रक्त तपासणी केली आहे. आता अहवालाची वाट पाहत आहोत.
शार्दुल हा एक खेळाडू आहे, जो टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅट खेळतो. त्याने आतापर्यंत 11 कसोटी, 47 एकदिवसीय आणि 25 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने गोलंदाजी करताना 31 बळी घेतले आणि फलंदाजी करताना 331 धावा केल्या. याशिवाय शार्दुलने एकदिवसीय सामन्यात 65 विकेट घेतल्या आणि फलंदाजीत 329 धावा केल्या. उर्वरित टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने 33 विकेट घेतल्या आहेत. त्याने टीम इंडियासाठी शेवटचा सामना डिसेंबर 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीच्या रूपात खेळला होता.
हेही वाचा-
‘पुन्हा दुखापती’ झाल्याच्या अफवांवर मोहम्मद शमीचा खुलासा, म्हणाला, “खोट्या….”
पाकिस्तानी खेळाडूंना चार महिन्यांपासून पगार नाही, केंद्रीय करार गमावण्याचाही धोका!
रोहित-कोहलीला बांग्लादेशी स्टारकडून मिळाली खास भेट, विराट म्हणाला ‘खूब भलो आची’