---Advertisement---

शार्दूल ठाकूर आणि भुवनेश्वर कुमारने सांगितले तिसर्‍या वनडे सामन्यातील यशाचे रहस्य, पाहा व्हिडिओ

On: सोमवार, मार्च 29, 2021 7:20 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंडच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना काल पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. या रोमांचक सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला ७ धावांनी पराभूत केले. यासह वनडे मालिकेत देखील २-१ अशा फरकाने विजय मिळविला.

या सामन्यात दुसर्‍या डावात इंग्लंडला विजयासाठी ३३० धावांचे लक्ष्य मिळाले होते. त्यांच्या सुरुवातीच्या विकेट्स लवकर पडल्यावर देखील अखेरीस सॅम कुरनने तुफान फटकेबाजी करत विजय खेचून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय गोलंदाजांनी संयम राखत अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि भारताचा विजय सुनिश्चित केला. आता सामना झाल्यावर भारताच्या दोन प्रमुख गोलंदाजांनी त्यांच्या रणनितीचा खुलासा केला आहे.

“मर्यादित षटकांच्या सामन्यात पिचकडून मदत काढावी लागते”
शार्दूल ठाकूरने या सामन्यात ४ बळी घेत विजयात मोलाचा वाटा उचलला. याबाबत सामन्यानंतर बोलतांना तो म्हणाला, “मर्यादित षटकांच्या सामन्यात चेंडू स्विंग होणे, लवकर बंद होते. त्यामुळे तुम्हाला मदत मिळणे बंद होते. अशा वेळी पिचकडून मदत काढून घ्यावी लागते.”
शार्दूलच्या गोलंदाजीवर भारताचा कर्णधार विराट कोहलीने आदिल रशीदचा एक लाजवाब झेल टिपला. याबद्दल देखील त्याने कोहलीचे कौतुक केले. तो म्हणाला, “त्याने जो झेल टिपला, तो खरंच अप्रतिम होता. मी रशीदची विकेट माझ्या गोलंदाजीवर आल्याने नक्कीच खुश आहे, मात्र कोहलीने टिपलेला झेल लाजवाब होता.”

https://twitter.com/BCCI/status/1376383616570253316?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1376383616570253316%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9hindi.com%2Fsports%2Fcricket-news%2Fshardul-thakur-and-bhuvneshwar-kumar-interview-each-other-597413.html

“अनुभवाने मिळाली मदत”
भुवनेश्वर कुमारने या सामन्यात गोलंदाजी आक्रमणाचे समर्थपणे नेतृत्व केले. आपल्या रणनितीबद्दल बोलतांना तो म्हणाला, “मी पहिल्या षटकांत चेंडू स्विंग करण्याचा प्रयत्न करत होतो. जेसन रॉयने चांगल्या चेंडूंवर देखील चौकार मारले. मात्र नशिबाने मी पहिल्याच षटकांत त्याला बाद करण्यात यश आले. त्यामुळे पुढे डावाची लय बदलली आणि पारडे भारताच्या पक्षात झुकले.”

महत्वाच्या बातम्या:

भारतीय संघ जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवणार का? इयान चॅपेल यांनी दिले उत्तर

भारीच की! एकाच षटकात ६ षटकार मारणारा थिसरा परेरा नववा क्रिकेटपटू; जाणून घ्या कोण आहेत अन्य ८ खेळाडू

सॅम करनच्या खेळीत एमएस धोनीची झलक दिसली, पाहा कुणी केलंय हे विधान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---