गुरुवारी (दि. 6 एप्रिल) आयपीएल 2023 स्पर्धेतील नववा सामना कोलकाता नाईट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळण्यात आला. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रंगलेल्या या सामन्यात कोलकाता संघ एकेवेळी 100 धावांच्या आत 5 विकेट्स गमावून बसलेला. मात्र, कोलकाता संघाच्या शार्दुल ठाकूर आणि रिंकू सिंग या फलंदाजांनी वादळी फलंदाजी करत संघाला मोठी धावसंख्या मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्यांनी संघाला दोनशे धावांचा टप्पा पार करण्यात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांच्या या कामगिरीमुळे चोहो बाजूंनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाच्या फलंदाजांनी प्राथमिकरीत्या चुकीचा ठरवला. यावेळी कोलकाताने निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 204 धावा चोपल्या. आता हा सामना जिंकण्यासाठी बेंगलोरला 205 धावा कराव्या लागतील.
शार्दुल आणि रिंकूची वादळी फलंदाजी
कोलकाताकडून फलंदाजी करताना सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक ठोकले. तसेच, एकूण 29 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या. या धावा करताना त्याने 3 षटकार आणि 9 चौकारांचा पाऊस पाडला. त्याला यावेळी रिंकू सिंग (Rinku Singh) याची साथ मिळाली. रिंकूनेही 33 चेंडूत 46 धावांचे योगदान दिले. आंद्रे रसेल बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या 5 बाद 89 इतकी होती. मात्र, शार्दुल आणि रिंकू यांनी डाव सांभाळला. त्यांच्यात 103 धावांची भागीदारी झाली. संघाची धावसंख्या 89 धावांवरून रिंकू बाद झाला तेव्हा 18.6 षटकात 192 इतकी होती. त्यानंतर शार्दुलही 19.4 षटकात संघाची धावसंख्या 198 असताना बाद झाला. त्यानंतर उमेश यादव याने 6 धावा करून संघाला 204 धावांपर्यंत पोहोचवले. शार्दुल आणि रिंकू यांच्याव्यतिरिक्त रहमानुल्लाह गुरबाज (Rahmanullah Gurbaz) यानेही 44 चेंडूत 57 धावा केल्या.
https://twitter.com/IPL/status/1644006538778931207
यावेळी बेंगलोरकडून गोलंदाजी करताना डेविड विली आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त मोहम्मद सिराज, मायकल ब्रेसवेल आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (shardul thakur and rinku singh helps Kolkata Knight Riders to score 204 from 89 )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्टार फलंदाजाला समजली अश्विनची ताकद, कॅरम बॉलने ऑफ स्टंप्स थेट उडवला
नाणेफेकीचा कौल ‘या’ संघाच्या पारड्यात, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन






