भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून (12 ऑगस्ट) लॉर्ड्सवर खेळला जाईल. दोन्ही संघ विजयासाठी आतुर असून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत आपले खाते उघडण्याकडे दोन्ही संघांचे लक्ष्य असेल. पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या नजरा दुसऱ्या कसोटीवर लागलेल्या आहेत, परंतु सामन्यापूर्वी दोन्ही संघांना मोठा धक्का बसू शकतो.
भारतीय अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर आणि इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड जखमी झाले आहेत. शार्दुल ठाकूर हॅमस्ट्रिंगच्या समस्येने त्रस्त आहे. तर प्रशिक्षणादरम्यान ब्रॉडची पोटरीची शिर ताणली गेली आहे. बुधवारी त्यांचे स्कॅनिंग केले जाईल आणि त्यानंतरच त्याच्या खेळण्यासंधर्भात निर्णय घेतला जाईल.
यूकेच्या मीडिया रिपोर्टनुसार, ब्रॉड या घटनेनंतर त्याच्या उजव्या पायावर कोणतेही वजन ठेवण्यास असमर्थ आहे. त्याला उजव्या पायाच्या पोटरीत समस्या असू शकते. अशा परिस्थितीत तो मालिकेच्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडू शकतो. लॉर्ड्सची कसोटी ब्रॉडच्या कारकिर्दीतील 150 वा कसोटी सामना होणार होता, पण आता त्याला त्याची वाट पाहावी लागेल असे वाटत आहे. ब्रॉड संघाबाहेर झाल्यास मार्क वुडला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते.
त्याचवेळी, द गार्डियनच्या बातमीनुसार, दुसऱ्या कसोटीपूर्वी भारताला शार्दुलच्या रूपातही धक्का बसू शकतो. त्याच्याऐवजी तर इशांत शर्माला संधी मिळू शकते. विराट कोहलीने आधीच स्पष्ट केले आहे की, भारत मालिकेत 4 वेगवान गोलंदाजांसह खेळेल. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या फलंदाजीकडे लक्ष असेल विशेषतः पहिल्या फळीकडे. केएल राहुल सोडला तर उर्वरित फलंदाजांनी सपशेल निराशा केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
सलाम तुमच्या कामगिरीला! १९८३ च्या विश्वचषकात भारतासाठी नायक ठरलेले ‘यशपाल शर्मा’
क्रिकेटसाठी ११ ऑगस्ट हा दिवस कायमचं विशेष ठरला, जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व
टी२० विश्वचषकानंतर द्रविड होणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक? एनसीएमधील कराराची मुदत संपली