---Advertisement---

टी२० विश्वचषकानंतर द्रविड होणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक? एनसीएमधील कराराची मुदत संपली

On: बुधवार, ऑगस्ट 11, 2021 1:51 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट ॲकॅडमी (NCA) येथील क्रिकेट प्रमुख पदासाठी अर्ज मागवले आहेत. यामध्ये सध्याचे प्रमुख आणि भारताचे माजी कर्णधार राहुल द्रविड पुन्हा अर्ज करू शकतो. भारताची बेंच स्ट्रेंथ (राष्ट्रीय संघासाठी खेळाडूंचा पूल) तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या द्रविडची जुलै 2019 मध्ये एनसीए प्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती; आता त्याच्या कामकाजाचा कालावधी संपणार असल्याने बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत.

द्रविडने यापूर्वी भारताच्या 19 वर्षांखालील आणि भारत अ संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केले होते. त्यांनतर त्याने एनसीएच्या क्रिकेट प्रमुखाची जबाबदारी स्विकारली होती. आता त्याच्या दोन वर्षांच्या कराराची मुदत संपली आहे आणि नियमांनुसार बीसीसीआयने त्यासाठी अर्ज मागवले आहेत. दोन वर्षांच्या विस्तारासाठी द्रविड पुन्हा अर्ज करण्याची शक्यता आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख (15 ऑगस्ट रात्री 11.59 पर्यंत) आहे.

बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, “राहुल द्रविड या पदासाठी पुन्हा अर्ज करू शकतो. परंतु, 2021 टी- 20 विश्वचषकानंतर रवी शास्त्रीचा कार्यकाळ नोव्हेंबर 2021 मध्ये संपतो आणि द्रविड राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्याची शक्यता आहे. काहीही झाले तरी, तो या व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग राहील. नुकत्याच श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या मर्यादित षटकांच्या संघाचे द्रविड हा मुख्य प्रशिक्षक होता. इंग्लंड दौऱ्यावर भारताचा मुख्य संघ होता.”

राहुल द्रविडला प्रशिक्षक व्हायचे नाही का?
श्रीलंकेतील सहा सामने संपल्यानंतर त्यांना भारताचे मुख्य प्रशिक्षक होण्याबाबत विचारण्यात आले. परंतु, त्याने या विषयावर फारसा रस दाखवला नाही. तो म्हणाला की, “प्रामाणिकपणे सांगायचे तर, मी खरोखर फार पुढे काहीही विचार केला नाही. मी जे करत आहे ते करण्यात मला आनंद मिळत आहे.”

मुख्य प्रशिक्षकासाठी सध्याची वयोमर्यादा एनसीएच्या प्रमुख भूमिकेप्रमाणेच 60 वर्षे आहे. शास्त्री मे मध्ये 59 वर्षांचे झाले. जर टी -20 विश्वचषकात भारताने चांगली कामगिरी केली नाही तर, द्रविड राष्ट्रीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या या शर्यतीत सामील होऊ शकतो. कर्णधार कोहली आणि शास्त्री या दोघांनी आतापर्यंत भारतासाठी कोणतीही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. शास्त्रींच्या देखरेखीखाली संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासह कसोटी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली. पण जागतिक विजेतेपद मिळवण्यात अपयशी ठरले.

एनसीएच्या प्रमुखांची जबाबदारी काय असेल?
बीसीसीआयच्या वेबसाइटनुसार, एनसीए क्रिकेट प्रमुख, ॲकॅडमीमध्ये क्रिकेट कोचिंगचे सर्व कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पूर्णपणे जबाबदार असतील. ॲकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेल्या सर्व क्रिकेटपटूंच्या तयारी, विकास आणि कामगिरीची जबाबदारी त्याच्यावर असेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

विनेश फोगटवर झाली निलंबनाची कारवाई, ऑलिम्पिक स्पर्धेतील वर्तन आले अंगाशी

लॉर्ड्सवर सर्वात यशस्वी ठरणारे ३ भारतीय गोलंदाज; एकजण आहे सध्याच्या संघात

बाप असावा तर असा! शतक झाल्यानंतर रॉस टेलर मुलीसाठी करतो ‘ही’ गोष्ट; वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---