इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघामध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील चौथ्या दिवशी (५ सप्टेंबर) भारतीय फलंदाजांचा बोलबाला राहिला. या सामन्यातील पहिल्या डावात अर्धशतक झळकावणाऱ्या शार्दुल ठाकूरने दुसऱ्या डावातही अर्धशतक झळकावले आहे. यासह त्याने मोठा विक्रम करत दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच माघारी परतले होते. त्यानंतर शार्दुल ठाकूर आणि रिषभ पंत या दोघांनी मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. यासह भारतीय संघाला मोठी आघाडी मिळवून दिली होती. शार्दुल ठाकूरने या डावात ७२ चेंडूंचा सामना करत ६० धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ७ चौकार आणि १ षटकार लगावला. तसेच पहिल्या डावात देखील त्याने ५७ धावांची खेळी करत भारतीय संघाला जोरदार पुनरागमन करून दिले होते. यासह त्याने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
असा कारनामा करणारा ठरला चौथा भारतीय फलंदाज
इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात शार्दुल ठाकूरने अप्रतिम फलंदाजी केली आहे. त्या तो ८ किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकांवर फलंदाजीला येऊन दोन्ही डावात अर्धशतक झळकावणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हरभजन सिंग, भुवनेश्वर कुमार आणि वृद्धिमान साहा यांनी असा कारनामा केला आहे.
हरभजन सिंगने २०१० मध्ये न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात अर्धशतक झळकावले होते. तर, भुवनेश्वर कुमारने हा कारनामा २०१४ मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध केला होता. शार्दुल, हरभजन आणि साहाने ८ व्या क्रमांकावर खेळताना हा कारनामा केला आहे. तर भुवनेश्वरने ९ व्या क्रमांकावर खेळताना हा कारनामा केला आहे.
आठव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन दोन्ही डावात अर्धशतक झळकावणारे भारतीय फलंदाज
हरभजन सिंग – ( न्यूझीलंड ,२०१०)
भुवनेश्वर कुमार – (इंग्लंड ,२०१४)
वृद्धिमान साहा – (न्यूझीलंड,२०१६)
शार्दुल ठाकूर -(इंग्लंड – २०२१)*
मोठ्या विक्रमाला घातली गवसणी
शार्दुल ठाकूरने दोन्ही डावात अर्धशतक झळकावत आणखी एक मोठा पराक्रम केला आहे. तो ८ व्या क्रमांकांवर फलंदाजी करताना एकाच सामन्यातील दोन्ही डावात शतक झळकावणारा जगातील सहावा, तर भारताचा तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हरभजन सिंग आणि वृद्धिमान साहा या भारतीयांनी देखील असा कारनामा केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कर्णधाराचे खेळाडूंवरील प्रेम! रोहितच्या शतकानंतर विराटचा उत्साह होता पाहाण्यासारखा, व्हिडिओ व्हायरल
“शानदार, जबरदस्त, जिंदाबाद!”, रोहितने विदेशात पहिले कसोटी शतक झळकावल्यानंतर दिग्गजांकडून होतंय कौतुक
पंतने ‘हा’ विक्रम करत धोनी, किरमानी यांच्यासारख्या दिग्गज यष्टीरक्षांकांमध्ये मिळवले स्थान