जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने सामने आहेत. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 469 धावा केल्या, तर प्रत्युत्तरात भारतीय संघ 296 धावांपर्यंत मजल मारू शकला. भारताचा अष्टपैलू शार्दुल ठाकुर याने महत्वपूर्ण योगदान दिले. आपल्या अर्धशतकाच्या जोरावर त्याने भारतीय संघाचा डाव सावरला. या अर्धशतकासोबतच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भल्याभल्यांना न जमलेला एक विक्रम आपल्या नावे केला.
भारतीय संघाने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जबरदस्त पुनरागमन केले. अजिंक्य रहाणे व शार्दुल ठाकूर यांनी अर्धशतके झळकावल्याने भारतीय संघ सामन्यामध्ये राहिला. दोघांनी सातव्या गड्यासाठी 109 धावांची भागीदारी केली. शार्दुलने सुरुवातीला संघर्ष केल्यानंतर 109 चेंडूंमध्ये 51 धावा केल्या. या अर्धशतकासोबत त्याने थेट डॉन ब्रॅडमन व ऍलन बॉर्डर या दिग्गज फलंदाजांची बरोबरी केली.
लंडन येथील ओव्हल मैदानावर शार्दुल ठाकूर याने ठोकलेले हे सलग तिसरे अर्धशतक आहे. लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर सलग तीन कसोटी अर्धशतके करणारा शार्दुल तिसरा विदेशी फलंदाज ठरला आहे. यापूर्वी ही कामगिरी डॉन ब्रॅडमन आणि एलन बॉर्डर यांच्या नावावर होती.
या सामन्याच्या तीन दिवसांच्या खेळाबाबत बोलायचे झाल्यास, स्टिव्ह स्मिथ व ट्रेविस हेड यांनी झळकावलेल्या शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 467 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघासाठी अजिंक्य रहाणे व शार्दुल ठाकूर यांनी अर्धशतके केली. मात्र, भारतीय संघ ऑस्ट्रेलियापेक्षा 173 धावांनी मागे पडला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाखेर 4 बाद 123 अशी मजल मारत आपली आघाडी 296 पर्यंत नेली.
(Shardul Thakur Equal Allen Border And Don Bradman Record At Oval In WTC Final)
ओव्हल स्टेडियमवर लागोपाठ डावांमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारे फलंदाज
शार्दुल ठाकूर – 3
डॉन ब्रॅडमन – 3
एलन बॉर्डर – 3
महत्वाच्या बातम्या –
दुसऱ्या महाराष्ट्र ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत तामिळनाडूच्या रोहित कृष्णा एसला विजेतेपद
IND vs AUS: भारत 296 धावांवर सर्वबाद, तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने गमावल्या चार महत्वाच्या विकेट्स