इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ५ कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना नॉटिंघम येथे झाला असून हा सामना अनिर्णीत राहिला. अखेरच्या दिवशी पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ न झाल्याने हा सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. या सामन्यातील भारताच्या अंतिम ११ खेळाडूंच्या संघावर अनेक दिग्गजांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. कारण यात आर अश्विनचा समावेश न्हवता.
अश्विनने याआधीही अनेक सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन केले होते. तसेच त्याने इंग्लंडमधील काऊंटी स्पर्धेत देखील उल्लेखनीय कामगिरी करत एका सामन्यात ७ विकेट्स घेतल्या होत्या. असे असतानाही या अनुभवी गोलंदाजाला संघातून वगळण्यात आले. त्याच्या ऐवजी संघात वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरला संधी देण्यात आली होती. तसेच फिरकीपटू म्हणून रविंद्र जडेजाला संधी मिळाली.
यानंतर अनेकांच्या मते, येणाऱ्या पुढील सामन्यात जडेजा ऐवजी अश्विनला संघात घेतले जाऊ शकते. कारण पहिल्या कसोटी सामन्यात जडेजाने केवळ १६ षटके गोलंदाजी केली होती. असे असले तरी जडेजाने फलंदाजीत कमाल करताना अर्धशतकी खेळी केली होती. हेच कारण असावे की, जडेजाला फंलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आले असावे. त्यामुळे, अगामी काळात अश्विनला भारतीय संघात स्थान मिळण्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक दीप दीसगुप्ता यांच्यामते भारतीय संघात अश्विनचा प्रतिस्पर्धी जडेजा नसून शार्दूल ठाकूर आहे.
बीबीसीच्या कसोटी सामन्यांसाठी समर्पित असलेल्या पॉडकास्टवर बोलताना दासगुप्ता म्हणाले, “अनेकांच्या मते, भारतीय संघात अंतिम ११ मधील स्थानासाठी जडेजा आणि अश्विन यांच्यात स्पर्धा आहे. परंतु, मला असे वाटत नाही. कारण, माझ्यामते अश्विनची खरी स्पर्धा तर शार्दूल ठाकूरसोबत आहे. खरेतर तेथील परिस्थीतीवर आणि भारतीय व्यवस्थापकीय मंडळावर अलंबून असेल की, कोणाला संघात स्थान द्यायचे आहे.”
त्याचबरोबर जडेजाबाबत बोलताना ते म्हणाला, “जडेजाचे पाहायला गेले तर त्याचा खरा प्रतिस्पर्धी हनुमा विहारी आहे. फलंदाजीची बाब लक्षात घेता, आता हे भारतीय व्यवस्थापन मंडळावर आहे, की त्यांना फलंदाज म्हणून ६ व्या क्रमांकावर कोणाला संघात संधी द्यायची.”
तसेच पुढे ते पुढे म्हणाले, “१२ ऑगस्टला होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील हाच संघ खेळताना दिसू शकतो. जर यामध्ये काही बदल झाला तर ते माझ्यासाठी आश्चर्यकारकच असेल.”
महत्वाच्या बातम्या –
–दुर्देवच म्हणावं! सलग २ वेळेस फलंदाजाच्या मांड्यांच्या मध्यभागी लागला चेंडू, व्हिडीओ होतोय व्हायरल