---Advertisement---

‘अजून तर खूप खेळणार आहे…’, टी-20 विश्वचषकातून वगळल्यानंतर शार्दुल ठाकुर नाराज

On: रविवार, ऑक्टोबर 9, 2022 6:06 PM
shardul Thakur
---Advertisement---

भारताचा वेगवान गोलंदाज आणि शार्दुल ठाकूर सध्या भारतीय संघासोबत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. मालिकेतिल दुसरा सामना रविवारी (9 सप्टेंबर) रांचीमध्ये खेळला गेला. या सामन्याच्या पूर्वसंथ्येला शार्दुल ठाकुर माध्यमांशी बोलत होता. यावेळी त्याने स्वतःच्या मनातील खदखद व्यक्त केली. आगामी टी-20 विश्वचषकात त्याला संधी न मिळाल्यामुळे शार्दुल नाराज असल्याचे दिसला. असे असले तरी, त्याने अजून धीर सोडला नाहीये आणि येत्या काळात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न देखील करणार आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) 35 धावा खर्च करून दोन विकेट्स घेऊ शकला, दुसऱ्या वनडेमध्ये त्याने 36 धावा देऊन एक विकेट घेतली. टी-20 विश्वचषक संघात संधी न मिळाल्यामुळे त्याने नाराजी व्यक्त केली, पण पुढच्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून तो तयार करत असल्याचेही सांगितले.

शार्दुल म्हणाला की, “उघड आहे, ही मोठी निराशा आहे. विश्वचषकात खेळणे आणि चांगले प्रदर्शन करणे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. माझी निवड झाली नाहीये, पण काहीच अडचण नाही.मला अजून खूप क्रिकेट खेळायचे आहे आणि पुढच्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक देखील आहे. मला ज्या सामन्यात संधी मिळेल, माझे लक्ष्य त्यात चांगले प्रदर्शन करणे आणि संघाला विजय मिळवून देण्यावर असेल.”

दरम्यान, वेगवान गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघात होता आणि आगामी टी-20 विश्वचषकात देखील त्याला राखीव खेळाडूंमध्ये संधी दिली गेली होती. परंतु दुखापतीमुळे त्याने आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून माघार घेतली आहे. विश्वचषका चाहर खेळेल, याचीही खूप कमी शक्यता आहे. शार्दुलने पुढे बोलताना चाहरच्या दुखापतीविषयी देखील मत मांडले.

“दुखापत होणे हा खेळाडा भाग आहे. कुठे ना कुठे खेळाडूला दाखापत नक्कीच होते. चाहर राखीव खेळाडूंमध्ये सहभागी होता आणि आता ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकातून देखील बाहेर होण्याच्याच मार्गावर आहे. जेव्हा एखाद्याला दुखापत होते, तेव्हा कोणताही खेळाडू त्याची जागा घेऊ शकतो. आपली जबाबदारी फक्त एवढीच असते की, जेव्हा संधी मिळेल, तेव्हा चोख भूमिका पार पाडायची. जर मला संधी मिळाली, तर मी मानसिक दृष्टीने तयार असेल,” असेही शार्दुल पुठे बोलताना म्हणाला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
INDvSA: हेंड्रिक्स-मारक्रमच्या ‘शतकीय’ भागीदारीने दक्षिण आफ्रिकेचे भारतासमोर 278 धावांचे टारगेट
आनंद स्वप्नपूर्तीचा! पहिली विकेट घेताच शाहबाझने असा केला जल्लोष; पाहा व्हिडिओ  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---