जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने सामने आहेत. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 469 धावा केल्या, तर प्रत्युत्तरात भारतीय संघ 296 धावांपर्यंत मजल मारू शकला. भारताचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू शार्दुल ठाकुर याने महत्वापूर्ण योगदान दिले. सोबतच आपल्या अर्धशतकाच्या जोरावर मोठा विक्रम देखील नावावर केला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. शार्दुल ठाकूने या सामन्यात खेळताना भारतासाठी 109 चेंडूत 51 धावा कुटल्या. ओव्हल स्टेडियमवर शार्दुलचे हे सलग तिसरे अर्धशतक ठरले आहे. या अर्धशतकाच्या जोरावर त्याने मोठा विक्रम नावावर केला. आपल्या संघासाठी आठ किंवा त्यानंतरच्या क्रमांकावर खेळताना विदेशात तीन अर्धशतके करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
याचसोबत त्याने डॉन ब्रॅडमन आणि एलन बॉर्डर यांच्या विक्रमाची बरोबरी देखील केली. लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर सलग तीन कसोटी अर्धशतके करणारा शार्दुल तिसरा विदेशी फलंदाज ठरला आहे. यापूर्वी ही कामगिरी डॉन ब्रॅडमन आणि एलन बॉर्डर यांच्या नावावर होती.
ओव्हल स्टेडियमवर लागोपाठ डावांमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारे फलंदाज
शार्दुल ठाकूर – 3
डॉन ब्रॅडमन – 3
एलन बॉर्डर – 3
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर पहिल्या डाव संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ 173 धावांच्या आघाडीवर होता. पहिल्या डावात भारताने 71 धावांवर चार विकेट्स गमावल्या होत्या. मात्र अजिंक्य रहाणे (89), रविंद्र जडेजा (48) आणि शार्दुल ठाकूर (51) यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियासाठी पहिला डाव ट्रेविस हेड आणि स्टीव स्मिथ यांनी गाजवला. हेटने 163, तर स्मिथने 121 धावांची खेळी केली. गोलंदाजी विभागाचे प्रदर्शन पाहिले, तर ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार पॅट कमिन्सने पहिल्या डावात सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्क, स्कॉट बोलाँड आणि कॅमरून ग्रीन यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. (Shardul Thakur is the FIRST player to score 3 50+ scores at an AWAY ground batting at No.8 or lower in Test history!)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
उठ लाबूशेन जागा हो..! विकेट गेली वॉर्नरची पण झोप उडाली लाबूशेनची, मजेशीर व्हिडिओ तूफान व्हायरल
WTC फायनल रंगतदार स्थितीत, टीम इंडिया 296वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाकडे 173 धावांची आघाडी