IPLक्रिकेटटॉप बातम्या

रोहित आणि रहाणेला शार्दुलने बनवले बॉडीगार्ड, बघून रितीका सजदेहने केलं ट्रोल, पाहा काय म्हणाली

भारतीय संघाने नुकतीच श्रीलंकेविरुद्धची टी-२० आणि कसोटी मालिका खेळली. या दोन्ही मालिका भारतीय संघाने जिंकल्या. दरम्यान, भारतीय संघाचा गोलंदाजी अष्टपैलू शार्दुल ठाकूरने रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. शार्दुलने शेअर केलेल्या फोटोची त्याच्या कॅप्शनमुळे चाहत्यांमध्ये खूप चर्चा होत आहे.

शार्दुलने स्वतःच्या इंस्टाग्राम खात्यावरून हा फोटो शेअर केला आहे. फोटोत शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) मध्यभागी आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) एका बाजूला, तर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) दुसऱ्या बाजूला आहे. हे तिघेही चालताना दिसत आहेत. रोहित आणि अजिंक्य शार्दुलचे अंगरक्षक असल्यासारखे दिसत आहे.

शार्दुलने या इंस्टाग्राम पोस्टला दिलेले कॅप्शन एवढेच मजेशीर आहे की, रोहितची पत्नी रितीका सजदेह (Ritika Sajdeh) हिनेही या पोस्टवर कॅमेंट करून शार्दुलला ट्रोल केले आहे. तसेच युजवेंद्र चहल आणि अजिंक्य रहाणेच्याही कमेंट्स आल्या आहेत.

पोस्टच्या कॅप्शनमध्ये शार्दुलने लिहिले आहे की, “अंगरक्षक ठेवणे, हा फेमस होण्याचा एक भागच आहे, असे मला वाटते.” शार्दुलच्या या पोस्टवर रोहितची पत्नी रितीकाने कमेंट केली आहे की, “तुला माहीत आहे की, पुढे काय येत आहे.”

तसेच फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने कमेंटमध्ये रोहित आणि अजिंक्यची फिरकी घेत लिहिले की, “बॉडीगार्ड्सची बॉडी कुठे आहे ठाकुर साहाब.” अजिंक्य रहाणेही मागे राहिलेला नाही. अजिंक्यने कमेंट करून लिहिले की, “फक्त तुम्हा दोघांना ड्रेसिंग रूमच्या बाहेर काढत आहे.” चाहत्यांच्या प्रतिक्रियाही पाहण्यासारख्या आहेत. काही चाहत्यांनी “लॉर्ड शार्दुल” अशी कमेंट केली आहे, तर काहींनी “मुंबईची पोरं” असे लिहिले आहे.

https://www.instagram.com/p/CbNHAMZK_-q/?utm_source=ig_web_copy_link

एकंदरीत पाहता शार्दुलची ही पोस्ट चाहत्यांमध्ये तुफान व्हायरल झाली आहे. दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या नुकत्याच खेळल्या गेलेल्या टी-२० आणि कसोटी मालिकेदरम्यान शार्दुल विश्रांतीवर असल्यामुळे तो मैदानात दिसला नव्हता. आयपीएल २०२२ हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे. मागच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळणारा शार्दुल आगामी हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करेल. मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने शार्दुल ठाकुरला १०.७५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते.

Related Articles