भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने आपल्या प्रेयसी मिताली पारुलकरसोबत साखरपुडा उरकला आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये हा समारंभ पार पडला. यामध्ये शार्दुल आणि मितालीच्या जवळच्या लोकांनीच हजेरी लावली होती. मात्र, शार्दुलने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर या सोहळ्याचा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ शेअर केलेला नाही. असे असले तरीही या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ आणि छायाचित्रे समोर आली आहेत.
भारतीय वेगवान गोलंदाज दीपक चाहरची बहीण मालती देखील या समारंभात सामील झाली होती. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शार्दुल आणि मितालीचे काही फोटोही शेअर केले आहेत. यासोबत तिने लिहिले की, ‘मिताली आणि शार्दुल तुम्हा दोघांचेही अभिनंदन. तुम्हाला खूप खूप आनंद आणि प्रेम लाभो, हार्दिक शुभेच्छा.’
मालतीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून या साखरपुडा सोहळ्याचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यामध्ये शार्दुल मितालीला रोमँटिक पद्धतीने काही वचने देताना दिसत आहे, ‘आप जहां जाओगे, मुझे पाओगे’,असे तो म्हणतो आहे.
https://www.instagram.com/p/CW2hqc9Pc29/?utm_medium=copy_link
त्याची ही शैली चाहत्यांना खूपच आवडली आहे. सोशल मीडियावर त्याचे साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून चाहतेही या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, ‘लॉर्ड शार्दुल देवीसोबत. तुम्हा दोघांना लग्नाच्या खूप शुभेच्छा.’ याबरोबरच शार्दुल आणि मितालीचा अजून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हे जोडपे पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, शार्दुल आणि मिताली पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकानंतर विवाहबंधनात अडकणार आहेत. शार्दुल हा न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळत नाहीये. त्याला बीसीसीआयने ‘वर्कलोड मॅनेजमेंट’ अंतर्गत (अतिरिक्त कामकाजाचे व्यवस्थापन) विश्रांती दिली आहे.
डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत तो खेळण्याची शक्यता आहे. या अष्टपैलू खेळाडूने भारतासाठी आतापर्यंत ४ कसोटी, १५ एकदिवसीय आणि २४ टी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण ६७ विकेट घेतल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-