सध्या रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई संघ 23 जानेवारीपासून जम्मू आणि काश्मीर विरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर खेळत आहे. ज्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईसंघाचे स्टार फलंदाज फलंदाजीत संघर्ष करताना, शार्दुल ठाकूरने धडाकेबाज शतक झळकावले. त्याने या सामन्याच्या दुसऱ्या डावात ही कमागिरी केली. शार्दुलचे शतक अशा वेळी झाले जेव्हा दुसरीकडे, मुंबईच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी या सामन्यात खूपच खराब कामगिरी केली. या सामन्याच्या पहिल्या डावातही शार्दुलने 51 धावा केल्या होत्या. ज्यामुळे संघ 100 धावांचा टप्पा ओलांडू शकला.
शार्दुल ठाकूर बराच काळ टीम इंडियाबाहेर आहे. ज्यामध्ये तो 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला होता. त्यानंतर तो आतापर्यंत पुनरागमन करू शकलेला नाही. अशा परिस्थितीत 2024-25 च्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याच्या बॅटमधून मिळालेल्या या शानदार कामगिरीमुळे त्याला टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. शार्दुल ठाकूरचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे दुसरे शतक आहे. याशिवाय शार्दुलने 13 अर्धशतकीय डाव खेळले आहेत. शार्दुलच्या शतकाच्या जोरावर, मुंबईचा संघ या सामन्यात पुनरागमन जोरदार पुनरागमन केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आतापर्यंत जम्मू आणि काश्मीरविरुद्ध 180+ धावांची आघाडी घेतली आहे.
🚨 HUNDRED FOR SHARDUL THAKUR 🚨
– Mumbai was 101/7, match on the line, Qualification on line and then Thakur has scored an iconic Hundred at BKC for Mumbai, What a knock, one to remember forever. pic.twitter.com/qVQnix2JXR
— Johns. (@CricCrazyJohns) January 24, 2025
मुंबई संघाच्या जम्मू आणि काश्मीर विरुद्धच्या सामन्याच्या दुसऱ्या डावातही टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी खूपच खराब कामगिरी केली ज्यामध्ये रोहित शर्माने 28 धावा केल्या तर यशस्वी जयस्वालने 26 धावा केल्या. मुंबईने दुसऱ्या डावात 101 धावांवर 7 विकेट गमावल्या. यानंतर शार्दुल ठाकूरने तनुश कोटियनसह मुंबईच्या डावाची धुरा सांभाळली. दोघांनी मिळून 250 धावांचा टप्पा ओलांडून मुंबईला सामन्यात परत आणले. दुसऱ्या दिवसाखेर शार्दुल ठाकुर (113) तनुश कोटियन (58) धावांवब नाबाद आहेत.
हेही वाचा-
रवींद्र जडेजाची रणजी ट्राॅफीत कहर कामगिरी, ठरला सामनावीरचा मानकरी, संघाचा एकतर्फी विजय
आयसीसीकडून मागील वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघाची घोषणा, विराट-रोहितला जागा नाही
आयसीसीचा महिला वनडे संघ जाहीर, या 2 भारतीय खेळाडूंना मिळालं स्थान