भारत आणि इंग्लंड यांच्यात ४ ऑगस्टपासून नॉटिंघमच्या मैदानावर पहिला कसोटी सामना सुरू झाला असून, यात अनेक भारतीय खेळाडूंना त्यांचा फॉर्म पाहता या दौऱ्यात त्यांना खेळण्याची संधी मिळाली. तसेच असेही काही खेळाडू आहेत ज्यांना त्यांच्या खराब फॉर्ममुळे या दौऱ्यातून वगळण्यात आले. त्यातीलच एक म्हणजे हार्दिक पांड्या.
पांड्या भारतीय संघातील एक अत्यंत उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. मात्र गेल्या काही काळापासून पांड्याची कामगिरी असमाधानकारक राहिली आहे. म्हणूनच पांड्याला या दौऱ्यातून डच्चू मिळाला. तसेच श्रीलंका दौऱ्यातही त्याची म्हणावी तशी कामगिरी राहिली नाही.
त्यामुळे भारतीय संघाने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसाेटी सामन्यात चौथा गोलंदाज म्हणून शार्दूल ठाकूरचा संघात समावेश केला. ठाकूर गोलंदाजी सोबत फलंदाजी देखील करू शकतो. याच्याआधीही ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ठाकूरने आपल्या फंलंदाजीने चांगली कामगिरी करत भारतीय संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. म्हणून कोहलीने ठाकूरला प्लेईंग इलेव्हनमध्ये म्हणजे अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान दिले.
तसेच ठाकूरने कोहलीच्या या निर्णयाला योग्य ठरवत पहिल्या कसोटी सामन्यात ३ विकेट्स काढल्या. ज्यात अर्धशतकीय खेळी करणारा इंग्लंडचा कर्णधार जो रूटचा देखील समावेश होता. त्याच षटकात ठाकूरने ओली रॉबिंसनला देखील पॅव्हेलियनला पाठवले. त्याच्या अशा कामगिरीमुळे त्याचे कौतुक केले जात आहे.
ठाकूर गोलंदाजीसह फलंदाजीही चांगली करू शकतो. त्यामुळे त्याला पांड्याचा पर्यायी खेळाडू म्हणून देखील पाहिलं जात आहे. याची एक झलक त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात गाबाच्या मैदानात दाखवून दिली आहे. तेव्हा त्याने वॉशिंगटन सुंदर सोबत ११५ चेंडूत ६७ धावांची भागिदारी केली होती.
केवळ कसोटीतच नव्हे तर एकदिवसीय आणि टी-२० मध्ये देखील ठाकूरने चांगले प्रदर्शन केले आहे. त्यामुळे ठाकूरकडे आता एक अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिले जात आहे. दुसरीकडे पांड्याचा फार्म कुठेच दिसत नाहीये. त्यामुळे पांड्याची टी-२० विश्र्वचषकातून सुद्धा हाकलपट्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ठाकूरला पांड्याऐवजी संघात स्थान देऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या –
विराटने वाईट दिवसांची काढली आठवण; म्हणाला, ‘कठीण काळात सचिनला मदत मागितली आणि…’
थोडीशी मजामस्ती! जेव्हा पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये झाली ख्रिस गेलची एन्ट्री, रंगला हास्यकल्लोळ
टी२० क्रमवारीत भुवनेश्वरला जबरदस्त फायदा, श्रीलंकेविरुद्ध घेतल्या होत्या सर्वाधिक विकेट्स