सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेनंतर आता सर्व राज्याचे क्रिकेट संघ विजय हजारे स्पर्धेसाठी जोरदार तयारी करत आहेत. यासाठी केरळच्या २० सदस्यांच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. २० फेब्रुवारी ते १४ मार्चदरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे.
सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत संजू सॅमसन याने केरळ संघाचे नेतृत्व स्वीकारले होते आणि कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. परंतु विजय हजारे ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी संजू सॅमसन ऐवजी सचिन बेबी याला केरळ संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली असल्यामुळे तिरुअनंतपूरम लोकसभा खासदार आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते शशी थरुर यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि या संघ निवडीबद्दल संताप देखील व्यक्त केला.
सचिन बेबीच्या नेतृत्वाखाली या संघात वेगवान गोलंदाज एस श्रीशांतचा देखील यात समावेश करण्यात आला आहे.
शशी थरूर यांची संतापजनक प्रतिक्रिया
शशी थरूर यांनी संघ निवडीबद्दल संताप व्यक्त करताना आपल्या सोशल मीडियावर सोमवारी (८ फेब्रुवारी) ट्विट केले होते की, “संजू सॅमसनसारख्या अनुभवी खेळाडूला कर्णधार पदावरून काढून टाकणे ही आश्चर्याची बाब आहे, ज्याने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत कर्णधार म्हणून चमकदार कामगिरी केली होती.”
पुढे ते म्हणाले की राज्यातील दोन सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज असिफ आणि बासिल थंपी यांना देखील संघात स्थान नाही, तसेच रोहन प्रेम सारख्या चांगल्या फलंदाजाला देखील संघातून डावलण्यात आले, असा हा संकुचितपणा स्वतःसाठी विनाशकारी आहे.
https://twitter.com/ShashiTharoor/status/1358810589951266816
२६ वर्षीय संजू सॅमसन याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत त्यात त्याने एकूण ८३ धावा काढल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ५५ सामन्यांत एकूण ३१६२ धावा केल्या असून यात १० शतके आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडच्या भेदक माऱ्यापुढे भारताचे आघाडीचे फलंदाज सपशेल फ्लॉप, एक-दोन नव्हे चक्क चौघे ‘बोल्ड-आऊट’
आता भारतातील क्रिकेटमध्येही होणार ड्रोन कॅमेऱ्याचा वापर, आयपीएलपासून होणार सुरुवात






