भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक स्टेडियम) येथे पार पडलेल्या सामन्यात इंग्लंडने २२७ धावांनी विजय मिळवला आहे. याबरोबरच ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने भारताला या सामन्यात ४२० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला ५८.१ षटकात सर्वबाद १९२ धावाच करता आल्या.
त्यातही भारताचे आघाडीचे ५ फलंदाज खास कामगिरी करू शकले नाहीत. इंग्लंडच्या गोलंदाजांनी मिळून भारताच्या पहिल्या ५ फलंदाजांपैकी चक्क चौघांच्या दांड्या गुल केल्या.
भारताचा विस्फोटक सलामीवीर रोहित शर्मा २० चेंडूत अवघ्या १२ धावांवर त्रिफळाचित झाला. इंग्लंडचा डावखुरा फिरकीपटू जॅक लीचने ५.३ षटकात त्याला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याच्यानंतर कसोटीपटू चेतेश्वर पुजारा आणि युवा फलंदाज शुबमन गिल यांच्यात अर्धशतकी भागिदारी होण्याच्या वाटेवर होती. अशात वेगवान गोलंदाज जेम्स अंडसरनने कमालीचा बाउंसर टाकत गिलची दांडी उडवली. त्यामुळे ८३ चेंडूत अर्धशतक करत गिल बाद झाला.
महा स्पोर्ट्सचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
गिलनंतर त्याच षटकातील पाचव्या चेंडूवर (२६.५ षटक) अंडसरनने शून्य धावांवर अजिंक्य रहाणेला त्रिफळाचित केले. शेवटी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला कर्णधार विराट कोहली चिवट झुंज देत डावास चालना देत होता. अशात बेन स्टोक्सने ५८व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर विराटला त्रिफळाचित केले. त्यामुळे १०४ चेंडूत ७२ धावांवर विराट मैदानाबाहेर पडला.
अशाप्रकारे इंग्लंडच्या गोलंदाजांनी मिळून भारताच्या वरच्या आणि मधल्या फळीतील ४ फलंदाजांच्या दांड्या उडवल्या. याआधी ८ वर्षांपुर्वी ऑस्ट्रेलियाने हा कारनामा केला होता. विशेष म्हणजे, तो सामनाही चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवरच झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित-विराटसारखे दिग्गज संघात असूनही टीम इंडिया का झाली पराभूत? जाणून घ्या पाच ठळक कारणं






