---Advertisement---

सॅमसनला वगळल्याने शशी थरूर यांची संघ व्यवस्थापनावर आगपाखड; लक्ष्मण-पंतला धरले धारेवर

On: बुधवार, नोव्हेंबर 30, 2022 11:20 AM
---Advertisement---

न्यूझीलंड दौऱ्यावरील भारतीय क्रिकेट संघाचा अखेरचा सामना बुधवारी (30 नोव्हेंबर) ख्राईस्टचर्च येथे सुरू झाला. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील या अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघात पुन्हा एकदा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याला पुन्हा एकदा बाकावर बसावे लागले. त्याला सातत्याने डावले जात असल्याने आता थेट काँग्रेस नेते व खासदार शशी थरूर यांनी संघ व्यवस्थापनावर आगपाखड केली आहे.

वनडे क्रिकेटमध्ये मागील काही काळापासून ठरत असलेल्या रिषभ पंत याला या तिसऱ्या सामन्यासाठी पुन्हा एकदा संघात जागा मिळाली. परंतु, पहिल्या सामन्यात उपयुक्त खेळी केलेल्या सॅमसन याला पुन्हा बाकावर बसून राहावे लागले. त्यामुळे संतापलेल्या थरूर यांनी पहिले ट्विट केले. त्यांनी लिहिले,

 

‘पंतने चौथ्या क्रमांकावर चांगली कामगिरी केल्याने, त्याला संधी देणे गरजेचं आहे असे लक्ष्मण त्यांनी म्हटलेले. तो चांगला खेळाडू आहे, पण सध्या फॉर्ममध्ये नाही. मात्र, मागील 11 पैकी 10 सामन्यांमध्ये तो अपयशी ठरला आहे. सॅमसनची वनडे सामन्यातील सरासरी 66 इतकी आहे. गेल्या पाचही सामन्यात त्याने धावा केल्या असतानाही तो बाकावर बसला आहे. याबद्दल विचार करा.’

या सामन्यात रिषभ अपयशी ठरल्यानंतर त्यांनी आणखी ट्विट केले. त्यांनी या ट्विटमध्ये लिहिले,

‘आता खरंच पंतला विश्रांती द्यावी लागणार आहे. संजूला पुन्हा एकदा डावलण्यात आले. त्याला आपली प्रतिभा दाखवण्यासाठी आता आयपीएलची वाट पहावी लागेल.’

आकडेवारीचा विचार केल्यास सॅमसन सध्या पंतपेक्षा वरचढ आहे. संजूने 11 वनडे सामन्यात 66 च्या सरासरीने 330 तर रिषभने 29 सामन्यात 35.62 च्या सरासरीने 855 धावा काढल्या आहेत.

(Shashi Tharoor Slam VVS Laxman And Rishabh Pant After Dropping Sanju Samson)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऋतुराजच्या मनाचा मोठेपणा! म्हणाला, “माझे द्विशतक संपूर्ण महाराष्ट्राला अर्पण करतो”
‘बास करा माझी इंग्रजी इथेच संपली’, पाकिस्तानी खेळाडूकडून पत्रकार परिषदेत स्पष्ट उत्तर 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---