---Advertisement---

शतकवीरांनाच केलं बाहेर, टीम इंडियाच्या संघ निवडीवरुन भडकले काँग्रेस खासदार शशी थरूर

On: शुक्रवार, जुलै 19, 2024 8:08 PM
shashi tharoor, team india
---Advertisement---

गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ पहिल्यांदाच श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला 27 जुलै ते 30 जुलै दरम्यान 3 सामन्यांची टी20 मालिका खेळायची आहे. तर 2 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान उभय संघात 3 वनडे सामने होतील. तत्पूर्वी निवड समितीने या मालिकांसाठी 15 सदस्यीय भारतीय संघांची घोषणा केली आहे. या संघातून काही अनपेक्षित खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. तर काही दावेदार खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

निवड समितीच्या या संघ निवडीवरुन काही माजी भारतीय दिग्गजांनी नाराजी दर्शवली आहे. यातच आता काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी निवड समितीवर टीका केली आहे. शतकवीर खेळाडूंना डावलल्याने त्यांनी निवड समितीवर निशाणा साधला आहे.

एक्स प्लॅटफॉर्मवरुन ट्विट करत शशी थरूर यांनी लिहिले, “श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड लक्षवेधक आहे. संजू सॅमसननं शेवटच्या वनडे सामन्यात शतक केलं होतं. मात्र, त्याला संघात स्थान दिलं  गेलेलं नाही. दुसरीकडे अभिषेक शर्मानं झिम्बाब्वेच्या विरोधात शतक झळकावलं होतं. त्याला देखील भारतीय टीममध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. निवड समितीच्या सदस्यासांठी भारतीय संघाच्या यशाला काही महत्त्व असेल, असं  वाटत नसावं. तरी देखील माझ्या टीमला शुभेच्छा आहेत.”

टी20 मालिकेसाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जायस्वाल, रिंकु सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद, मोहम्मद सिराज

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर)ऋषभ पंत (विकेटकीपर),श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर, अर्शधीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा

महत्त्वाच्या बातम्या – 

“त्याला कर्णधारपद मिळायला हवं होतं”, हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ उतरला माजी क्रिकेटपटू; गंभीरवरही उघडपणे बोलला
जिथे-तिथे फक्त किंग कोहलीचीच हवा! ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत सर्व सेलिब्रेटींना टाकलं मागे
तेलंही गेलं आणि तूपही! कर्णधारपदासह पांड्याने उपकर्णधारपदही गमावले, आता फक्त खेळाडू म्हणून…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---