भारताचा वरिष्ठ संघ सध्या इंग्लंड दौर्यावर आहे. परंतु, इंग्लंड दौऱ्यावरील काही खेळाडूंना दुखापत झाली असल्याने त्यांच्या जागी काही खेळाडूंना इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे. दुखापतीमुळे संघातून बाहेर गेलेल्या शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खानच्या जागी श्रीलंकेत असलेल्या तीन खेळाडूंना बदली खेळाडू म्हणून पाठवण्यात येणार असून, पुढील २४ तासांत खेळाडू हे खेळाडू इंग्लंडसाठी उड्डाण घेऊ शकतात.
हे खेळाडू जाणार इंग्लंडला
एका प्रमुख संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, ‘इंग्लंड दौऱ्यावर दुखापतग्रस्त झालेल्या शुबमन गिल, आवेश खान व वॉशिंग्टन सुंदर यांच्या जागी बदली खेळाडू म्हणून सध्या श्रीलंका दौऱ्यावर असलेले सलामीवीर पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल व मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव यांना इंग्लंडला पाठवले जाईल. पुढील चोवीस तासात हे खेळाडू इंग्लंडकडे रवाना होती. याचाच अर्थ हे तिन्ही खेळाडू आगामी टी२० मालिकेत खेळताना दिसणार नाहीत.’
भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी२० मालिका २५ जुलैपासून सुरू होईल.
यापूर्वी या तीन खेळाडूंची नावे आली होती समोर
या तीन खेळाडूंची निवड होण्यापूर्वी पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव व फिरकीपटू जयंत यादव यांना इंग्लंडला पाठवण्याची चर्चा सुरू झाली होती. परंतु, जयंत यादव इंग्लंडला जाणार की नाही याबाबत अद्याप खुलासा झाला नाही. जयंत सध्या भारतात असल्याने इंग्लंडला गेल्यास त्याला जास्त दिवस क्वारंटाईन राहावे लागेल.
भारत खेळणार पाच सामन्यांची कसोटी मालिका
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ ४ ऑगस्टपासून नॉटिंगहॅम येथे पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात करेल. तत्पूर्वी, भारतीय संघाला २८ जुलैपासून तीन दिवसीय सराव सामना खेळायचा आहे. या दौऱ्यासाठी भारताचा २० सदस्यीय संघ तसेच पाच राखीव खेळाडू इंग्लंडमध्ये गेले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्या मुर्खांना काही माहीत नसतं’; श्रीलंकेच्या प्रशिक्षकांचे वादग्रस्त विधान
वारं की अजून काही! फलंदाजाने शॉट मारण्यापुर्वीच स्टंप्सवरील बेल्स पडल्या खाली, पंचही थक्क
‘होय, तो शो टॉपर आहे’; पाहा स्वत: विस्फोटक फलंदाज असणाऱ्या सूर्यकुमारने कोणाचं केलंय इतकं कौतुक?






