Loading...

शिअरफोर्स आंतरमहाविद्यालयीन स्पोर्टस् लीग; डॉ. वसंतदादा पाटील, एस.बी. पाटील कॉलेजने पटकाविले विजेतेपद

पुणे । पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाने विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन शिअरफोर्स स्पोर्ट्स लीगमधील फुटबॉल स्पर्धेत अनुक्रमे मुले आणि मुलींच्या गटाचे विजेतेपद पटकावले.

वानवडी येथील एस. आर. पी. एफ. मैदानावर ही स्पर्धा झाली. या स्पधेर्तील मुलांच्या गटाच्या अंतिम लढतीत पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाने पेनल्टी शूटआउटमध्ये सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर ३-१ने मात केली.

निर्धारित वेळेत ही लढत गोलशून्य बरोबरीत सुटली. यामुळे टायब्रेकचा अवलंब करावा लागला. यात पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाकडून हर्ष पांडे, मेहुल अगरवाल, पार्थ मतकरी यांनी गोल केले, तर सिंहगड कॉलेजकडून बोनी पटेल यालाच गोल करता आला.

यानंतर मुलींच्या गटाच्या अंतिम लढतीत एस बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाने लोहगावच्या डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर १-०ने मात केली.

यात स्नेहल जी. हिने अकराव्या मिनिटाला गोल करून एस. बी. कॉलेजला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी अखेरपर्यंत कायम राखून एस. बी. कॉलेजने विजेतेपद पटकावले.

Loading...

निकाल –
मुले –
अंतिम फेरी – पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ० (टायब्रेक – हर्ष पांडे, मेहुल अगरवाल, पार्थ मतकरी) वि. वि. सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ०. (टायब्रेक – बोनी पटेल).

उपांत्य फेरी – १) सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – १ (जयंत कापसे ९.१२ मि.) वि. वि. अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ०.

Loading...

२)पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ४ (ऋषभ खैरे ९. ३८ मि., ९.५४ मि. हर्ष पांडे ९ मि. ३४ से., आदित्य भोळे ९.४७ मि.) वि. वि. एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर -०.

मुली –

अंतिम फेरी एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – १ (स्नेहल जी. ११ मि.) वि. वि. डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर -०.

You might also like
Loading...