---Advertisement---

वुमेन्स बीबीएलमध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला!! राधा अन् शेफालीच्या कामगिरीने सिडनी सिक्सरचा विजय

On: रविवार, ऑक्टोबर 17, 2021 10:07 PM
---Advertisement---

वुमेन्स बिग बॅश लीग २०२१ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत देखील भारतीय महिला खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेतील पाचवा सामना सिडनी सिक्सर्स आणि होबार्ट हरिकेन या दोन्ही संघामध्ये पार पडला. या सामन्यात सिडनी सिक्सर्स संघाकडून शेफाली वर्माने तुफानी अर्धशतकी खेळी केली आणि राधा यादवने अप्रतिम गोलंदाजी करत सिडनी सिक्सर्स संघाला ५ गडी राखून विजय मिळवून दिला.

या सामन्यात सिडनी सिक्सर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना होबार्ट हरीकेन संघाकडून रिचा घोषने ४६ चेंडूंमध्ये १ चौकार आणि ३ षटकारांचा साहाय्याने ४६ धावांची खेळी केली. तर साशा मुलोनीने १६ चेंडूंमध्ये ४ चौकारांच्या साहाय्याने २२ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर होबार्ट हरीकेन संघाला २० षटकांअखेर ९ बाद १२५ धावा करण्यात यश आले होते.

या धावांचा पाठलाग करताना सिडनी सिक्सर्स संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी शेफाली वर्मा आणि एजे हेलीची जोडी मैदानावर आली होती. परंतु एजे हेलीला मोठी खेळी करता अली नाही. ती अवघ्या ३ धावा करत माघारी परतली. तर शेफाली वर्माने ५० चेंडुंमध्ये ६ चौकारांच्या साहाय्याने ५७ धावांची खेळी केली आणि एलिस पेरीने ३३ चेंडूंमध्ये २७ धावांची खेळी करत हा सामना सिडनी सिक्सर्स संघाला ५ गडी राखून जिंकून दिला.

भारतीय खेळाडूंचा बोलबाला 
सिडनी सिक्सर्स संघात भारतीय महिला संघातील राधा यादव आणि शेफाली वर्मा यांचा समावेश आहे. या दोन्ही खेळाडूंनी या सामन्यात चमकदार कामगिरी केली. प्रथम गोलंदाजी करताना राधा यादवने ४ षटकात ३१ धावा खर्च करत २ गडी बाद केले. तर धावांचा पाठलाग करताना शेफाली वर्माने ५० चेंडूंमध्ये ६ चौकारांसह ५७ धावांची खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या – 

विराट म्हणतो, ‘२००७ टी२० विश्वचषकाने कारकिर्दीवर मोठा परिणाम झाला, एक तरुण खेळाडू म्हणून मला…’

विराटला भेटण्यापूर्वी अनुष्का क्वारंटाईन; समोर असूनही एकमेकांना भेटणे झाले कठीण, पाहा फोटो

भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांसाठी मित्रांची विराटकडे मागणी; कर्णधाराकडून आलं ‘असं’ उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---