नॉटिंगहॅम। आज(6 जून) 2019 विश्वचषकातील 10 वा सामना विंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ट्रेंट ब्रिज मैदानावर सुरु आहे. या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला योग्य ठरवत विंडीजच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीवर सुरुवातीला नियंत्रित ठेवले होते.
सुरुवातीला ऑस्ट्रेलियाची आवस्था 16.1 षटकात 5 बाद 79 धावा असतानाही ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथने ऍलेक्स कॅरे, नॅथन कुल्टर नाईल यांना साथीला घेत ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला. पण त्याची सातव्या विकेटसाठी कुल्टर नाईलबरोबर 102 धावांची शतकी भागीदारी रंगलेली असताना तो ओशोन शॉमसच्या गोलंदाजीवर 73 धावा करुन बाद झाला.
त्याचा बाउंड्री लाईनला शेल्डन कॉट्रेलने सुरेख झेल घेतला. थॉमसने 45 व्या षटकातील दुसरा चेंडू गुड लेन्थला टाकला. या चेंडूवर स्मिथने बॅकवर्ड स्केअर लेगच्या दिशेने मोठा फटका खेळला. यावेळी कॉट्रेल फाईन लेगपासून पळत आला आणि एका हाताने तो चेंडू झेलला.
पण त्याच्या लगेचच लक्षात आले की तो बाउंड्री लाईनच्या जवळ आहे आणि पळण्यावर नियंत्रण ठेवता येणार नाही. त्यामुळे त्याने बाउंड्री लाईन क्रॉस करण्याआधी चेंडू हवेत फेकला आणि नंतर तो चेंडू खाली येईपर्यंत बाहेर येऊन नंतर तो चेंडू झेलला. त्याचा हा झेल पाहुन स्मिथही चकीत झाला होता.
स्मिथ बाद झाल्यानंतर कुल्टर-नाईलने ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळताना 92 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 49 षटकात सर्वबाद 288 धावा केल्या आणि विंडीजला 289 धावांचे आव्हान दिले आहे.
विंडीजकडून कार्लोस ब्रेथवेटने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच ओशान थॉमस, शेल्डन कॉट्रेल आणि आंद्रे रसलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर कर्णधार जेसन होल्डरने 1 विकेट घेतली.
Will we see a better catch at #CWC19 than this spectacular grab?https://t.co/5xcF4HunOr
— ICC (@ICC) June 6, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–…म्हणून विकेट घेतल्यानंतर सलामी देत सेलिब्रेशन करतो शेल्डन कॉट्रेल
–हिटमॅन रोहित शर्माच्या शतकी खेळीबद्दल कर्णधार कोहली म्हणाला…
–काय सांगता! डिविलियर्सला खेळायचा होता २०१९ चा विश्वचषक, पण…






