भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नुकताच न्यूझीलंड ए विरुद्धच्या चारदिवसीय प्रथमश्रेणी सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर केला. गुजरातचा सलामीवीर प्रियांका पांचाल याला संघाचे कर्णधार बनवण्यात आले आहे. तसेच अनेक युवा खेळाडूंना देखील सांगण्यात स्थान दिले गेले. भारताच्या भविष्याच्या संघाचा विचार करता हा उत्कृष्ट संघ असल्याचे बोलले जातेय. मात्र, या संघ निवडीनंतर सौराष्ट्राचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज शेल्डन जॅक्सन याने एक ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
जॅक्सनने केले ट्विट
मागील अनेक वर्षापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा काढणारा जॅक्सन अजूनही भारतीय संघासाठी खेळू शकला नाही. आता इंडिया ए संघातील त्याची जागा देखील गेली आहे. याच नंतर त्याने ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली. त्याने लिहिले,
I have a right to believe and dream that if i have performed for 3 continuous season, i may get picked on the basis of my performances not age, tired of hearing this that im a good player and performer but im old????, im 35 not 75 ????????
— Sheldon Jackson (@ShelJackson27) August 24, 2022
“मागील तीन वर्षापासून सातत्याने चांगली कामगिरी केल्यानंतर मला स्वप्न पाहण्याचा आणि विश्वास ठेवण्याचा अधिकार आहे. मला माझ्या कामगिरीच्या जोरावर निवडले जावे, वयाच्या नाही. मी आता हे ऐकून कंटाळलो आहे की, मी चांगला खेळाडू आहे आणि चांगली कामगिरी करतोय. पण माझं वय झालंय. अरे मी ३५ चा आहे ७५ चा नाही.”
शेल्डन जॅक्सन याला देशांतर्गत क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे. सौराष्ट्र संघासाठी त्याने आजवर अप्रतिम कामगिरी करून दाखवलीये. त्याच्या कारकिर्दीचा विचार केला गेल्यास त्याने २०११ मध्ये प्रथमश्रेणी पदार्पण केल्यापासून ७९ सामन्यात ५०.३९ च्या सरासरीने ५९४७ धावा केल्या आहेत. यात १९ शतकांचा समावेश आहे. आयपीएल २०२२ मध्ये तो कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळताना दिसला होता. मात्र, त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या-
आता चीनलाही खेळायचय ‘जबरा’ क्रिकेट! भारताकडेच मागितली ‘या’ गोष्टीची मदत
रोज मारतोयं १५० षटकार! भारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानच्या फलंदाजाचा भयानक प्लान
बांगलादेशच घोडं आशिया कप आधीच अडल! एका पाठोपाठ तीन मॅचविनर स्पर्धेतून बाहेर






