चेन्नई सुपर किंग्सचा (सीएसके) कर्णधार एमएस धोनी युवा खेळाडूंसाठी एक आदर्श आहे. धोनी अनेकदा या खेळाडूंना आपले अनुभव सांगताना दिसतो. आयपीएल २०२१ मध्येही तो अशा तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसत आहे. प्रत्येक सामन्यानंतर काही युवा खेळाडूंसह धोनीचे एकतरी छायाचित्र दिसत असते. ज्यामध्ये तो खेळाडूंना खेळाच्या बारकाईने स्पष्टीकरण देताना दिसतो. आता या यादीतील नवे नाव म्हणजे सौराष्ट्रचा यष्टिरक्षक फलंदाज शेल्डन जॅक्सन. जॅक्सन आयपीएल २०२१ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून (केकेआर) खेळत आहे.
जॅक्सनने घेतली धोनीची भेट
बुधवारी (२१ एप्रिल) सीएसके आणि केकेआर यांच्या दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल २०२१ मधील पंधरावा सामना खेळला गेला. अत्यंत उत्कंठावर्धक झालेल्या या सामन्यात सीएसकेने १८ धावांनी विजय साजरा केला होता. या सामन्यानंतर सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी याची केकेआरचा यष्टीरक्षक शेल्डन जॅक्सन यानी भेट घेतली. या भेटीदरम्यान जॅक्सनने आपल्या बॅटवर आणि ग्लोव्हजवर धोनीची स्वाक्षरी घेतली.
जॅक्सनने या भेटीचे छायाचित्र इंस्टाग्रामवरून शेअर केले आहे. या छायाचित्राला त्याने ‘शब्दात न सांगता येणारा क्षण’ असे कॅप्शन दिले.
https://www.instagram.com/p/CN8OMUQJJT9/
शाहरूख खानला दिल्या होत्या टिप्स
सामन्यानंतर युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची धोनीची ही पहिली वेळ नाही. पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यानंतर तो पंजाबचा युवा फलंदाज शाहरुख खान याला टिप्स देताना दिसून आला होता. शाहरुख देखील धोनीच्या टिप्स लक्षपूर्वक ऐकताना दिसला. त्याआधी दिल्ली कॅपिटल्सच्या आवेश खान याच्यासोबत त्याने छायाचित्र घेतले होते. यापूर्वीच्या आयपीएल हंगामामध्येदेखील अनेक अनुभवी खेळाडू त्याच्या अवतीभवती दिसले आहेत. धोनी अगदी निस्वार्थपणे या सर्वांना आपले अनुभव सांगताना दिसतो.
युवा खेळाडूंना देतो पाठींबा
धोनी हा सुरुवातीपासून तरुण खेळाडूंना पाठिंबा देताना दिसला आहे. सीएसकेचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड सलग तीन सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतरही घूमने त्याला चौथ्या सामन्यात संधी दिली व त्याने ६४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. याआधी देखील दीपक चाहर, शार्दुल ठाकूर या खेळाडूंना त्याने मोलाचे सहकार्य केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘कॅप्टन कूल’ धोनीच्या ‘या’ गुणाची ऑलिम्पिकपटूलाही पडली भुरळ
आकाशी ड्रेस अन् चेहऱ्यावर गोड स्माईल; मिसेस बुमराहच्या फोटोवर जस्सी घायाळ, दिली ‘अशी’ रिऍक्शन






