---Advertisement---

Video: झेल घेतल्यावर क्षेत्ररक्षकासमोर विकेटकिपरने जोडले हात, असं सेलिब्रेशन तुम्ही पाहिलं नसेल

On: बुधवार, मार्च 16, 2022 6:06 PM
Hayley-Matthews-Shemaine-Campbelle
---Advertisement---

न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत १४ वा सामना मंगळवारी (१५ मार्च) ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला संघात पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ ७ विकेट्सने विजय मिळवला. असे असले तरी, वेस्ट इंडिज महिलांनी झेल घेतल्यानंतर केलेले सेलिब्रेशन या सामन्यादरम्यान चर्चेचा विषय राहिला. त्यांच्या सेलिब्रेशनचे व्हिडिओही व्हायरल होत आहे.

झाले असे की, वेस्ट इंडिजने या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या तीनच विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे या तिन्ही विकेट्स झेलच्या रुपात गेल्या आणि तिन्ही झेल अष्टपैलू हेली मॅथ्यूजने (Hayley Matthews) घेतले. त्यामुळे तिसऱ्या झेलनंतर तिचे आणि यष्टीरक्षक शेमेन कँपबेलने (Shemaine Campbelle) मजेशीर सेलिब्रेशन केले. याचा व्हिडिओ आयसीसीच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या १६ व्या षटकात वेस्ट इंडिजच्या चिनेल हेन्रीने टाकलेल्या अखेरच्या चेंडूवर एलिसा पेरीने (Ellyse Perry) शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र स्लीपमध्ये उभ्या असलेल्या हेली मॅथ्यूजने तिचा शानदार झेल घेतला. हा तिचा सामन्यातील तिसरा झेल ठरला. त्यामुळे यष्टीरक्षक कँपबेलने तिच्यासमोर गुडघ्यावर बसून हात जोडून सेलिब्रेशन केले.

https://www.instagram.com/p/CbG97o1lPsc

त्यापूर्वी मॅथ्यूजने शॅमिलिया कॉनेलच्या गोलंदाजीवर मेग लेनिंगचाही स्लीपमध्ये झेल घेतला होता, तर एलिसा हेलीचा स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेतला. ऑस्ट्रेलियाने या तिन्ही विकेट्स ५८ धावांवर गमावल्या होत्या. पण नंतर ऑस्ट्रेलियाकडून रचेल हाईन्सने अर्धशतक करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

https://www.instagram.com/p/CbG6hyPlfMq

ऑस्ट्रेलियाचा चौथा विजय 
महिला विश्वचषकात (ICC Women’s World Cup 2022) १४ व्या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना ४५.५ षटकात सर्वबाद १३१ धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजकडून कर्णधार स्टेफनी टेलरने एकाकी झुंज देताना ५० धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून एलिसा पेरी आणि ऍश्ले गार्डनरने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या तीन विकेट्स ५८ धावांवर गमावल्या असल्या तरी, नंतर रचेल हाईन्सने नाबाद ८३ धावांची खेळी केली. तिला बेथ मुनीला २८ धावा करत मोलाची साथ दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने १३२ धावांचे आव्हान ३०.२ षटकातच पूर्ण केले.

महत्त्वाच्या बातम्या – 

वेगवान आणि फिरकी गोलंदाज असूनही अश्विन-बुमराहमध्ये ‘या’ महान कर्णधाराला दिसते समानता

क्षणिक सुख! रविंद्र जडेजाने गमावला ‘नंबर १’चा ताज, ‘या’ धाकड अष्टपैलूची अव्वलस्थानी उडी

इंग्लंडविरुद्धच्या मोठ्या पराभवानंतरही भारतीय संघ विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणार, पाहा कसं?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---