---Advertisement---

संधी मिळताच फलंदाजांने धारण केला ‘रुद्रावतार’, ४ चेंडूत ठोकले सलग ४ षटकार

---Advertisement---

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत गुरुवारी (१७ जून) पार पडलेल्या सामन्यात इस्लामाबाद युनायटेड आणि पेशावर जाल्मी हे दोन्ही संघ सामने सामने होते. या सामन्यात पेशावर जाल्मी संघाचा विस्फोटक फलंदाज शेफरेन रुदरफोर्डने षटकारांचा पाऊस पाडला आहे. त्याच्या या विस्फोटक फलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Sherfane Rutherford four sixes in an over )

या सामन्यात पेशावर जाल्मी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय पूर्णपणे फसला होता. उस्मान ख्वाजाने या सामन्यात तुफान फटकेबाजी करत शतक झळकावले होते. याच शतकी खेळीच्या जोरावर इस्लामाबाद संघाला २० षटकअखेर २ बाद २४७ धावा करण्यात यश आले होते.

रुदरर्फोर्डची तुफान फटकेबाजी
प्रत्युत्तरात पेशावर जाल्मी संघासमोर २४८ धावांचे मोठे आव्हान होते. संघातील सलामी फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली होती. त्यानंतर १४ व्या षटकात रुदरर्फोर्डने मैदानात वादळ आणले होते. १४ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर शोएब मलिकने चौकार लगावला होता. दुसरा चेंडू वाईड चेंडू होता. त्यानंतर टाकलेल्या चेंडूवर शोएब मलिकने एक धाव घेत रुदरर्फोर्डला स्ट्राईक दिली.

मग नंतर काय, रुदरर्फोर्डने षटकारांचा पाऊस पाडला. तिसऱ्या चेंडूवर रुदरर्फोर्डने मिड ऑफच्या वरून षटकार लगावला; तर चौथ्या चेंडूवर त्याने मिड ऑनच्या वरून षटकार मारला. तसेच पाचव्या चेंडूवर त्याने डीप एक्स्ट्रा कवरच्या दिशेने षटकार लगावला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवरही त्याने पॉइंटच्या वरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला. त्याचा हा विस्फोटक अंदाज पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले.

https://twitter.com/thePSLt20/status/1405564660007333888?s=20

रुदरर्फोर्डने अवघ्या ८ चेंडूत २९ धावा केल्या. यामध्ये ४ खणखणीत षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. परंतु त्याला आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. १५ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. इस्लामाबाद संघाने या सामन्यात १५ धावांनी विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या-

युजवेंद्र चहलच्या पत्नीने केला ‘विरुष्का’सोबतचा फोटो शेअर; अनुष्काबद्दल बोलताना म्हणाली, ‘ती खूप…’

जेव्हा अव्वल गोलंदाज राशिदने खाल्ला होता सपाटून मार, इंग्लंडच्या फलंदाजांनी ठोकले होते ११ षटकार

धोनीने तुझी कारकिर्द संपुष्टात आणली? चाहत्याच्या प्रश्नावर सेहवागने दिले होते ‘असे’ उत्तर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---