पाकिस्तान सुपर लीग २०२० मध्ये पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचं नाव गाजत आहे. नुकतेच आयपीएल २०२० स्पर्धा पार पडली. यामध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणारा फलंदाज शेर्फेन रदरफोर्ड पीएसएलमध्ये खेळण्यासाठी चक्क मुंबईची जर्सी घालून गेला होता. त्यावेळी तो चांगलाच चर्चेत आला होता. परंतु आता तो पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
कराची किंग्ज संघाकडून खेळताना घातले मुंबई इंडियन्स संघाचे ग्लोव्हज
यावेळी त्याने कराची किंग्ज संघाकडून खेळताना मुंबई इंडियन्स संघाचे ग्लोव्हज घातले होते. शेर्फेनने या सामन्यात केवळ १ धाव केली. परंतु त्याने सुपर ओव्हरमध्ये शानदार फलंदाजी करत कराची संघाला विजय मिळवून दिला. शेर्फेनने सुपर ओव्हरमध्ये मुलतान सुलतानचा वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीरच्या षटकात एक षटकार आणि एक चौकार ठोकला. त्यामुळे संघाला विजय मिळाला. तरीही शेर्फेनच्या ग्लोव्हजचा फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. त्यामुळे आता भारतीय चाहते पाकिस्तान सुपर लीगवर टीका करत आहेत.
https://twitter.com/KumarSk955524/status/1328621661273264132
https://twitter.com/Robert76159428/status/1328381515646992387
#KarachiKings#QualifierMatch – #MatchUpdate – #HBLPSLV – #Playoffs
6⃣ & 4️⃣ in such a crucial situation of SUPER OVER‼️
Well done 👑 #King #SherfaneRutherford 🙌🏻 pic.twitter.com/O5bo4PT16e— Muhammad Ahmed (@Ahmedkh15245624) November 14, 2020
शेर्फेनला आयपीएल २०२०मध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. परंतु हंगाम संपताच तो चांगलाच चर्चेेत आला आहे. मुंबईने मागील वर्षी दिल्ली कॅपिटल्सकडून शेर्फेनला आपल्या ताफ्यात सामील केले होते. त्यावेळी मध्य आयपीएल हंगामात दिल्लीकडून शेर्फेनने सात सामने खेळले होते.
यापूर्वी पीएसएलचे पुढील सामने खेळण्यासाठी शेर्फेन मुंबईच्या जर्सीत दिसला. त्याचा फोटो कराची किंग्जने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला. त्या फोटोत दिसत आहे की विमानतळावर त्याचे स्वागत केले जात आहे.
Arrival of our 👑 #King #SherfaneRutherford for the Playoffs of #HBLPSLV 👊🏻
Karachi Kings Phir Se Tayyar Hai‼️#HBLPSLV #KarachiKings #YehHaiKarachi #PhirSeTayyarHain pic.twitter.com/qGMNBAf7dG— Karachi Kings (@KarachiKingsARY) November 11, 2020
टी२० स्पेशालिस्ट शेर्फेन रुदरफोर्ड
शेर्फेनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये ४७ टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने २०.१६ च्या सरासरीने आणि १३३.२६ च्या स्ट्राईक रेटने ६२५ धावा केल्या आहेत. शेर्फेनने या धावा करताना १ अर्धशतकही ठोकले आहे. शेर्फेनने पीएसएलमध्ये आपल्या संघाला अंतिम सामन्यात पोहोचवले आहे. त्यामुळे आता कराची किंग्ज संघाला अंतिम सामन्यात त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सची जर्सी आणि मास्क घालून पाकिस्तान सुपर लीग खेळायला गेला हा खेळाडू; संघ झाला ट्रोल
फक्त तू आणि मी! वेस्ट इंडिजच्या खेळाडूने हटके अंदाजात केला साखरपुडा
चर्चा तर होणारंच! विराट कोहलीला ट्रोल करणारं ट्वीट सूर्यकुमार यादवकडून लाईक
ट्रेंडिंग लेख-
आठवणीतील १९८७ विश्वचषक : मार्टिन क्रो यांच्या ‘त्या’ झेलाने सामन्याचा नूर पालटला
धन्यवाद आणि गुडबाय! सचिन बोलत होता अन् वानखेडेवर चाहते रडत होते…