भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज शिखर धवन सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व करत आहे. शिखर धनव क्रीडा जगतातील एक मनमोकळा खेळाडू म्हणून ओळखला जातो. आपल्या सोशल मीडियावर धवन नेहमीच नवनवीन पोस्ट शेअर करत आला आहे. धवनच्या एका अशाच पोस्टची चर्चा सध्या सुरू आहे. यात तो धरमशालामध्ये संघ सहकाऱ्यांससोबत एका उंच टेकडीवर ट्रेकला गेल्याचे दिसते.
शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या नेतृत्वातील पंजाब किंग्ज संघाला आपला पुढचा सामना धरमशालामध्येच खेळायचा आहे. आयपीएल 2023 मधील पंजाब किंग्जचा हा 13वा सामना आहे. बुधवारी (16 मे) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध हा सामना खेळण्याआधी शिखर धवन आपल्या मित्रांसोबत धरमशालाच्या निसर्गाचा आनंद घेताना दिसला. धवनने आगामी सामन्यासाठी सराव सत्रातून वेळ काढून धरमशालाच्या सौदर्याचा अनुभव घेतला आहे. धवन आणि त्याचे मित्र या व्हिडिओत सध्या ट्रेंटमध्ये असलेल्या इंस्टाग्राम रिल्सचे अनुकरण करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये धवनने लिहिले की, “हॅलो धरमशाला.”
https://www.instagram.com/reel/CsS0oIuIUSO/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MTIyMzRjYmRlZg==
व्हिडिओवर भारतीय संघाचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग आणि दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडा यांच्या कमेंट्स आल्या आहेत. हरभजनने लिहिले की, धवन स्टेंडसेटर आहे, तर रबाडाने लिहिले, ‘डोप.’ चाहत्यांना धवनचा हा व्हिडिओ खूपच आवडला आहे. सध्या व्हायरल होत असलेली ही पोस्ट आणि यापूर्वीच्या अनेक पोस्टमुळे चाहते नेहमीच धवनकडे वेगवेगळ्या मागणी करत आले आहेत. अनेकांच्या मते धवनने क्रिकेटनंतर अभिनय श्रेत्रातही हात आजमावला पाहिजे.
धवनच्या नेतृत्वातील पंजाबचे चालू आयपीएल हंगामातील प्रदर्शन पाहिले, तर संघाने 12 पैकी 6 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. गुणतालिकेत पंजाब संघ 12 गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. लीग स्टेजमध्ये पंजाबला अजून 2 सामने खेळायचे आहेत आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी हे दोन्ही सामने जिंकने आवश्यक असणार आहे. (Shikhar Dhawan and Punjab Kings players went to trek in Dharamshala )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘जेव्हा क्रिकेट कळायला लागले, तेव्हापासून विराटच माझ्यासाठी…’, शतक झळकावल्यानंतर गिलचे मोठे भाष्य
शतक ठोकल्यानंतर स्वतः पंजाब किंग्जच्या मालकिनीने घेतली प्रभसिमरनची मुलाखत, युवराजची लक्षवेधी कमेंट