भारतीय संघातील खेळाडू हे सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतात. ते नेहमीच सराव करत असताना किंवा रिकाम्या वेळात आपल्या चाहत्यांसाठी काही-ना-काही पोस्ट करून त्यांची मनं जिंकत असतात. तसेच चाहते देखील या खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात. अशातच पहिला टी-२० सामना सुरू होण्यापूर्वी शिखर धवन आणि सूर्यकुमार यादव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भारतीय संघातील डाव्या हाताचा आक्रमक सलामी फलंदाज शिखर धवन याने, पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी सराव करत असताना सूर्यकुमार यादव सोबतचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यात बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांच्या ‘बडे मिया-छोटे मिया’ या चित्रपटातील गाणे वाजत आहे. ‘बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभानल्लाह’, असे ते गाणे असून यावर धवन आणि यादव अभिनय करताना दिसत आहेत.
या व्हिडिओला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दर्शवला आहे. तसेच हजारोंच्या घरात लाईक्सही मिळाल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CMSWF-bAYoj/?utm_source=ig_web_button_share_sheet
भारतीय क्रिकेटपटूंनी तमिळ गाण्यावर केलता डान्स
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सुरू असताना, भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू, आर अश्विन, आक्रमक फलंदाज हार्दिक पंड्या आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांचा देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ते प्रसिद्ध तमिळ गीत ‘वाथी कमिंग’वर थिरकाताना दिसले होते. या व्हिडिओला लाखो लोकांनी पसंती दर्शवली होती. तसेच काही दिवसांपूर्वीच भारतीय महिला संघातील खेळाडूंनी देखील याच गाण्यावर डान्स केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
सूर्यकुमार यादवला बुमराह-संजनाच्या नात्याची पूर्वकल्पना होती? ‘ते’ ट्विट करत आहे इशारा
“पोलार्डने नंतर माझ्याशी क्षमा मागितली आणि..,” ‘त्या’ विवादास्पद घटनेबद्दल श्रीलंकन फलंदाजाचा खुलासा
टी२० मालिका: पाहुण्यांना चारणार पराभवाची धूळ! ‘या’ भारतीय शिलेदारांवर असेल सर्वांची नजर