---Advertisement---

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी दिल्लीच्या संघाची धुरा ‘गब्बर’वर; भारताचा ‘हा’ प्रमुख वेगवान गोलंदाजही करणार पुनरागमन

On: शनिवार, डिसेंबर 26, 2020 3:23 PM
---Advertisement---

कोरोना महामारीमुळे लांबलेल्या भारतातील देशांतर्गत क्रिकेट हंगामाची सुरुवात सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेने होते आहे. बीसीसीआयने जानेवारी महिन्यात या स्पर्धेचे आयोजन केले आहे. अनेक महिन्यांनी पुन्हा एकदा देशांतर्गत स्पर्धा सुरु होत असल्याकारणाने सगळ्याच्य संघांनी या स्पर्धेसाठी कंबर कसून तयारी सुरू केली आहे.

दिल्लीचा संघदेखील या स्पर्धेत विजेतेपदाच्या ईर्षेने उतरत असून त्यांच्या संघाचे कर्णधारपद शिखर धवनकडे सोपविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकलेला वेगवान गोलंदाज इशांत शर्माचाही दिल्लीच्या ४२ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. इशांतला पुनरागमनाच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्वाची असून फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येईल, त्यासाठी तयारी करायला भारताच्या या अनुभवी गोलंदाजाला ही स्पर्धा उपयुक्त ठरेल.

सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेचे आयोजन १० ते ३१ जानेवारी या कालावधीत करण्यात आले आहे. ही स्पर्धा सहा राज्यांमध्ये जैव सुरक्षित वातावरणात खेळविली जाईल. त्यामुळे सगळ्या संघातील खेळाडूंना २ जानेवारीपासून जैव सुरक्षित वातावरणात राहणे, बंधनकारक असेल. या स्पर्धेचे साखळी सामने संपल्यानंतर रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे करंडकाबाबत बीसीसीआय निर्णय घेईल. याबाबत सदस्यांचा अनुभव देखील महत्वाचा ठरेल. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यात आयपीएलचा लिलाव असल्याने बीसीसीआयने मुश्ताक अली टी-२० स्पर्धेला प्राधान्य दिले असल्याचे कळते.

मुश्ताक अली स्पर्धेसाठी संघांची सहा गटात विभागणी करण्यात आली आहे. यात ५ एलिट गट तर एका प्लेट गटाचा समावेश आहे. स्पर्धेचे साखळी सामने 19 जानेवारीपर्यंत खेळले जातील, तर बाद फेरीच्या सामन्यांना २० जानेवारी पासून सुरुवात होईल. एलिट गटाचे साखळी सामने मुंबई, चेन्नई, कोलकाता, इंदौर, चेन्नई आणि वडोदरा येथे होणार असून प्लेट गटाचे सामने मात्र फक्त चेन्नईतच खेळविले जातील. या स्पर्धेचे उपांत्य सामने २९ जानेवारी रोजी खेळविले जाणार असून अंतिम सामना ३१ जानेवारी अहमदाबाद येथे होईल.

महत्वाच्या बातम्या:
– IND vs AUS : पहिल्या दिवसाखेर भारताच्या १ बाद ३६ धावा, पदार्पण करणाऱ्या शुबमन गिलची शानदार सुरुवात
बॉक्सिंग डे कसोटी : पहिल्या दिवसाअखेर न्यूझीलंडच्या ३ बाद २२२ धावा, केन विलियम्सन शतकाच्या जवळ
– व्वा! संघनायक असावा तर असा, ‘त्या’ एका कृतीने अजिंक्य रहाणेने जिंकली कोट्यवधी क्रिकेट रसिकांची मने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---