---Advertisement---

आयपीएलमध्ये पुन्हा तळपली ‘गब्बर’ची बॅट! ५ व्यांदा ‘असा’ कारनामा करत धवनची विराटशी बरोबरी

On: मंगळवार, ऑक्टोबर 5, 2021 1:37 AM
---Advertisement---

इंडियन प्रिमीयर लीगच्या १४ व्या हंगामातील ५० वा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवला गेला. चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील या सामन्यात दिल्लीने चेन्नईवर ३ गाड्यांनी विजय मिळवत गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं आहे. या सामन्यात शिखर धवनने केलेल्या ३९ धावांच्या उपयुक्त खेळीने दिल्लीचा विजय सोपा झाला. शिखरने या खेळीसह कोहलीच्या एका विक्रमाची देखील बरोबरी केली आहे.

शिखरने पाचव्या वेळेस आयपीएल हंगामामध्ये ५०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. या सोबतच त्याने विराट कोहलीच्या बरोबरीत स्थान मिळवले आहे. कोहलीनेही पाच वेळेस ही कामगिरी केली आहे. या यादीत डेविड वॉर्नर पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने ६ वेळेस आयपीएल हंगामामध्ये ५०० हुन अधिक धाव केल्या आहेत. या यादीत चौथ्या क्रमांकावर लोकेश राहुल आहे. त्याने चार वेळेस हा पराक्रम केला आहे.

या आयपीएलमध्ये डेविड वॉर्नर चांगल्या फॉर्म मध्ये नाही, तर दुसरीकडे विराट कोहलीला खूप उशिरा सूर गवसला आहे. या उत्कृष्ट कामगिरीनंतर शिखरने भारतीय संघाच्या निवडकर्त्यांचे लक्ष आपल्याकडे खेचले आहे. यंदाच्या टी२० विश्वचषक स्पर्धेत त्याची निवड झालेली नाही.

सर्वाधिकवेळा आयपीएल हंगामात ५०० पेक्षा अधिक धावा करणारे फलंदाज 
६ – डेविड वॉर्नर
५ – विराट कोहली
५ – शिखर धवन
४ – केएल राहुल

या सामन्यात नाणेफेक जिंकत दिल्ली कॅपिटल्स संघाने चेन्नईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. फलंदाजी करताना चेन्नईचे जवळपास सर्वच फलंदाज अपयशी ठरले. केवळ अंबाती रायडूने नाबाद ५५ धावा झळकावल्या. त्याला धोनीने १८ धावांची साथ दिली. ज्यामुळे चेन्नईने १३६ धावा करत दिल्लीसमोर १३७ धावांचे आव्हान ठेवले होते.

दिल्लीची फलंदाजीही चेन्नईप्रमाणे ढासळली. पण शिखरने सुरुवातीला केलेल्या ३९ धावा आणि शिमरॉन हेटमायरच्या महत्त्वाच्या वेळी केलेल्या नाबाद २८ धावांच्या जोरावर दिल्लीने अखेर ३ गड्यांनी सामना जिंकला. दिल्ली संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे, तर चेन्नई दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांनी या आधीच प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘बर्थडे बॉय’ला दिल्लीकडून विजयी भेट; पंत वाढदिवशी ‘असा’ कारनामा करणारा तेंडुलकरनंतरचा दुसराच कर्णधार

‘धोनी सीएसकेचा बॉस’, आयपीएल २०२१ ‘कॅप्टनकुल’चा अखेरचा हंगाम असल्याच्या चर्चेवर स्टेनचे भाष्य

‘विकेट घेण्यापेक्षा तू हे कर’, विराटने चहल दिला होता ‘हा’ गुरुमंत्र

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---