भारताचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून टी20 मालिका हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखाली जिंकली. आता तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार असून त्यामध्ये भारताचे कर्णधारपद शिखर धवन सांभाळणार आहे. त्याने याआधीही भारताच्या वनडे संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेविरुद्ध 3-2, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2-1 आणि वेस्ट इंडिज विरुद्ध 3-0 अशा मालिका जिंकल्या. यावरून त्याच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेत सुधारणा झाली, असे शिखरने म्हटले आहे.
एका माध्यमाशी शिखर धवन (Shikhar Dhawan) बोलत होता. तो म्हणाला, “जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तुम्ही घेतलेल्या निर्णयावरून तुमच्यात किती आत्मविश्वास आहे, हे दिसून येते.”
आपल्या नेतृत्वाबाबत बोलताना धवन पुढे म्हणाला, ” याआधीही अनेकदा झाले आहे की, मी गोलंदाजाला अतिरिक्त षटक देत होतो, आता माझ्या निर्णय घेण्यात आणखी सुधारणा झाली असून कोणाला राग आला तरी चालेल मात्र संघासाठी योग्य असेल तोच निर्णय घेतो. संघात संतुलन राखणे आणि खेळाडूंचा विश्वास मिळवणे आवश्यक आहे.”
नुकतेच भारताने न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली. त्यामध्ये संजू सॅमसन (Sanju Samson) आणि उमरान मलिक (Umran Malik) यांना एकाही सामन्याच्या अंतिम अकरामध्ये जागा मिळाली नव्हती. यामुळे चाहते पंड्यावर चांगलेच निराश दिसले. त्यांनी आपला राग सोशल मीडियामार्फत दर्शवला.
पंड्याने त्याचे स्पष्टीकरण देताना म्हटले, “मालिका जर अधिक सामन्यांची असेल तर मी त्यांना नक्कीच संघात घेणार.” आता वनडे संघातही त्या दोघांचा संघात समावेश आहे. यामुळे त्यांना खेळवले जाईल की पुन्हा एकदा ते दोघे बाकावर असतील, याबाबत एकच चर्चा सुरू आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला वनडे सामना शुक्रवारी (25 नोव्हेंबर) ऑकलंडच्या इडेन पार्कवर येथे खेळला जाणार आहे. ही मालिका भारताच्या प्रमाणवेळेनुसार सकाळी 7 वाजता खेळली जाणार आहे. Shikhar Dhawan before the ODI series said, ‘He will take the right decision for team, who is angry…’
न्यूझीलंडविरुद्ध भारताचा वनडे संघ – शिखर धवन (कर्णधार), शुबमन गिल. सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाझ अहमद, रिषभ पंत, संजू सॅमसन, शार्दुल ठाकुर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चाहर, उमरान मलिक, कुलदीप सेन.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जरा इकडे पाहा! भारताला विश्वविजेता बनवणाऱ्या खेळाडूची बीपीएलमध्ये एन्ट्री; म्हणाला, ‘जगातली भारी स्पर्धा’
सूर्यकुमार यादव टी20 क्रमवारीत अव्वल, तरीही विराट कोहली ‘या’ बाबतीत पुढेच






