---Advertisement---

INDvENG: शिखर धवनचा ‘तो’ फटका इतका खतरनाक होता की चेंडूच बदलावा लागला

On: मंगळवार, मार्च 23, 2021 5:28 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानच्या वनडे मालिकेला गहुंजे येथे सुरुवात झाली. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या एमसीए स्टेडियमवर मालिकेतील तिन्ही सामने खेळविले जातील. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघासाठी रोहित शर्मा शिखर धवन यांनी सलामी दिली. मात्र, धवनच्या एका फटक्यामुळे चक्क काहीकाळ सामना थांबवावा लागला.

भारतीय संघात झाले बदल
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात बराचसा भारतीय संघ बदललेला दिसला. रोहित शर्मा व शिखर धवन हे अनुभवी खेळाडू सलामीवीर म्हणून संघात सामील झाले. तर, कर्णधार विराट कोहली, श्रेयस अय्यर व हार्दिक पंड्या यांनी संघातील जागा कायम राखली. चांगल्या फॉर्ममध्ये असलेला रिषभ पंत संघात जागा मिळवू शकला नाही.

त्याच्याजागी, केएल राहुल यष्टीरक्षकाची जबाबदारी सांभाळेल. भारतीय संघासाठी अष्टपैलू कृणाल पंड्या व वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यांनी वनडे पदार्पण केले. शार्दुल ठाकूर व भुवनेश्वर कुमार हे वेगवान गोलंदाजीचा भार वाहतील. कुलदीप यादव चा रुपानी संघात एकमेव स्पेशलिस्ट फिरकीपटू आहे.

धवनमुळे थांबवावा लागला सामना
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना काहीशी संथ सुरुवात केली. इंग्लंडच्या गोलंदाजांनी नियंत्रित मारा केल्याने भारतीय संघ पहिल्या १० षटकात केवळ ४० धावा बनवू शकला होता. रोहित शर्मा व शिखर धवन यांना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज आणि मोकळेपणाने फटकेबाजी करू दिली नाही.

मात्र, या दरम्यान भारतीय आवश्यक तिसऱ्या षटकात असे काही घडले की, ज्यामुळे सामना थांबवावा लागला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड गोलंदाजी करत असताना तिसर्‍या षटकाच्या चौथ्या चेंडूवर शिखर धवनने सणसणीत चौकार मारला. हा भारतीय डावातील पहिला चौकार होता. धवनचा हा फटका इतका जोरदार होता की, त्यामुळे चक्क चेंडू बदलावा लागला आणि त्या कारणाने सामना काही काळ थांबला गेला.

धवन विराटने सावरला डाव
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १५.१ षटकात रोहित शर्माच्या रूपाने पहिला बळी गमावला. रोहितने २८ धावा बनवल्या. त्यानंतर विराट कोहली व शिखर धवनने दुसऱ्या गड्यासाठी १०५ धावांची भागीदारी केली. चांगल्या सुरुवातीनंतर विराट वैयक्तिक ५६ धावा काढून बाद झाला. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा ३३ षटकानंतर भारतीय संघाच्या १७८ धावा झाल्या होत्या. शिखर ९१ तर, श्रेयस अय्यर एका धावेवर नाबाद होता.

महत्त्वाच्या बातम्या –

अभिमानास्पद! १७ वर्षीय शेफाली वर्मा आयसीसी फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी

विराट कोहलीने वनडेमध्ये रचला इतिहास; मायदेशात सर्वात कमी डावात १० हजार धावा करणारा पहिलाच फलंदाज

जिगरबाज रोहित! हातातून रक्त येत असतानाही नाही सोडले मैदान, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---