शुक्रवारी (दि. 19 मे) धरमशाला येथे पार पडलेल्या आयपीएल 2023च्या 66व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध पंजाब किंग्स संघाला 4 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. हा सामना गमावत पंजाबला स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला, तर राजस्थान विजय मिळवत 14 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहोचला. पंजाब किंग्स संघाने पराभव पत्करला असला, तरीही कर्णधार शिखर धवन याने इतिहास रचला.
शिखर धवनचा विक्रम
या सामन्यात पंजाब किंग्स संघाचा कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) याने 12 चेंडूत 17 धावा केल्या. यामध्ये त्याने 1 षटकार आणि 2 चौकारही मारले. यासह त्याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा धवन हा पहिला फलंदाज बनला. खरं तर, धवन हा आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. त्याने आतापर्यंत 6616 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, यादरम्यान त्याच्या बॅटमधून सर्वाधिक 750 चौकार निघाले आहेत. त्यामुळे आयपीएलमध्ये शिखर धवन 750 चौकार (Shikhar Dhawan 750 Fours) मारणारा पहिला फलंदाज बनला.
सर्वाधिक चौकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार डेविड वॉर्नर (David Warner) दुसऱ्या स्थानी आहे. त्याने 639 चौकार मारले आहेत. तसेच, तिसऱ्या स्थानी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली (Virat Kohil) आहे. त्याने आतापर्यंत 630 चौकार मारले आहेत. याव्यतिरिक्त चौथ्या स्थानी रोहित शर्मा (Rohit Sharma) असून त्याने 544 चौकार मारले आहेत. तसेच, 2021मध्ये शेवटचा आयपीएल खेळणारा सुरेश रैना हा पाचव्या स्थानी असून त्याने 506 चौकार मारले आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे फलंदाज
750 चौकार- शिखर धवन*
639 चौकार- डेविड वॉर्नर
630 चौकार- विराट कोहली
544 चौकार- रोहित शर्मा
506 चौकार- सुरेश रैना
धवनची आयपीएल 2023मधील कामगिरी
खरं तर, शिखर धवन याने आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत एकूण 11 सामने खेळत 373 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 अर्धशतकांचाही समावेश आहे. त्याने या हंगामात एकूण 49 चौकार आणि 12 षटकारांचीही बरसात केली. तसेच, तो 2 वेळा नाबाद राहिला आहे. त्याने यादरम्यान 3 अर्धशतके झळकावली असून त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही 99 इतकी राहिली आहे. (shikhar dhawan creates history becomes first batsmen to hit 750 fours in ipl pbks vs rr match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चिमकुल्याने धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट मारताच ‘महानायक’ही फिदा; म्हणाले, ‘भारतीय क्रिकेटचं भविष्य…’
‘त्याला विनाकारण द्वेष देऊ नका’, आख्खा हंगाम फ्लॉप ठरलेल्या रियानने 2 षटकार मारताच दिग्गजाचा पाठिंबा