भारतात क्रिकेट हा खेळ खूपच लोकप्रिय आहे. एखाद्या वेळी मुलं शाळेला दांडी मारतील, पण क्रिकेट खेळणं सोडणार नाहीत. सध्या इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचाही थरार रंगला आहे. यामध्ये जगभरातील अनेक खेळाडू आपली प्रतिभा दाखवत आहेत. भारतीय युवा खेळाडूही चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत. अशातच ‘महानायक’ म्हणून ओळखले जाणारे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल होत आहे.
खरं तर, अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांनी लहान मुलाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये चिमुकला शानदार पद्धतीने स्ट्रेट ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह आणि महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याचा आयकॉनिक हेलिकॉप्टर शॉट (Helicopter Shot) मारतानाही दिसत आहे.
अमिताभ बच्चन यांचा व्हिडिओ
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एक लहान मुलगा खूपच प्रामाणिकपणे क्रिकेटचे अनेक शॉट्स खेळताना दिसत आहे. बॉलिवूड ‘शहंशाह’ अमिताभ बच्चन यांनी हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “भारतीय क्रिकेटचे भविष्य सुरक्षित हातात आहे.”
या व्हिडिओला आतापर्यतं 1 कोटी 8 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, 27 लाखांहून अधिक युजर्सनी व्हिडिओ लाईक केला आहे. याव्यतिरिक्त 16 हजार लोकांनी या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
हा व्हिडिओ पाहून नेटकरी या चिमकुल्याचे कौतुक करताना दिसत आहेत. तसेच, ते भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली, एमएस धोनी यांच्याशी त्याची तुलनाही करत आहेत. एका युजरने लिहिले की, “भविष्यातील धोनी व्हर्जन.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “आगामी काळातील विराट.” तसेच, आणखी एकाने लिहिले की, “व्वा, एकदम भारी शॉट्स.”
आयपीएल 2023 स्पर्धे अखेरच्या टप्प्यात
आयपीएल 2023 स्पर्धेबाबत बोलायचं झालं, आतापर्यंत स्पर्धेतील 66 सामने पार पडले आहे. तसेच, हंगामातील शेवटचा साखळी सामना 21 मे रोजी खेळला जाणार आहे. यानंतर प्ले-ऑफ फेरीला सुरुवात होईल. या हंगामातील गुणतालिकेत 66 सामन्यांनंतर गुजरात टायटन्स संघ 18 गुणांसह अव्वलस्थानी विराजमान आहे. तसेच, चेन्नई सुपर किंग्स 15 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे, तर लखनऊ सुपर जायंट्स संघही 15 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. तसेच, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ 14 गुणांसह चौथ्या स्थानी विराजमान आहे. (legend actor amitabh bachchan says indian cricket future in safe hands watch video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्याला विनाकारण द्वेष देऊ नका’, आख्खा हंगाम फ्लॉप ठरलेल्या रियानने 2 षटकार मारताच दिग्गजाचा पाठिंबा
प्ले-ऑफचे स्वप्न भंगताच कॅप्टन धवनने ‘या’ खेळाडूंना धरले जबाबदार; म्हणाला, ‘चूक केली…’