भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन त्याच्या स्टाईलसाठी चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. डोक्यावरचे कमी केस ही त्याची ओळख आहे. धवनच्या पावलावर पाऊल ठेवत त्याची मुलगी आलिया धवनने तिचे केस कापले आहेत. आलियाने तिचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत सांगितले आहे की, तिने एका विशेष कारणामुळे हे पाऊल उचलले आहे.
यावेळी ती म्हणाली की, “कॅंसरग्रस्त लोकांसाठी मी असा निर्णय घेतला आहे. स्वत: माझ्या लहान बहिणीने माझे केस कापले आहेत. माझ्याबरोबर माझ्या बॉयफ्रेंडनेही त्याचे केस कापले आहेत.”
इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत आलियाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मी माझ्या आई-वडिलांना धन्यवाद देऊ इच्छिते. त्यांनी मला हे करण्यासाठी आत्मविश्वास दिला. याचबरोबर मला माझ्या बॉयफ्रेंडलाही धन्यवाद द्यायचे आहेत. माझ्याबरोबर त्यानेही त्याचे केस कापले. शिवाय त्या सर्व लोकांचेही धन्यवाद ज्यांनी माझ्यासह त्यांचेही केस कापले आणि कँसर पिडीत लोकांच्या मदतीसाठी दान दिले.’
यासह इतरांना संदेश देत आलिया म्हणाली, “जर तुम्ही पूर्ण टक्कल करू शकत नसाल तर थोडेसे तरी केस कापा. सर्वांनी आपापल्या पद्धतीने जागरूकता करायला हवी आणि दान करून कँसर पिडितांची मदत करायला हवी.”
https://www.instagram.com/p/B9tQsyQH7H8/
आपल्या मुलीला प्रोत्साहित करत तिची आई आयेशा धवनने इंस्टाग्रामवर तिचा फोटो शेअर केला. आणि लिहिले की ‘तू करून दाखवले. तू माझी मुलगी असल्याचा मला अभिमान वाटतो.’ धवननेही आपल्या मुलीचा फोटो शेअर करत आपल्या मुलीचा अभिमान असल्याचे सांगितले आहे.
तसेच यापूर्वी धवनची लहान मुलगी रिहा धवननेही तिचे केस कापून क्रँसरग्रस्त व्यक्तींसाठी ते दान केले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
–आयपीएलच्या बैठकीत झाली ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा…
–रिचर्डसन पाठोपाठ हा क्रिकेटपटूही सुटला कोरोनाच्या कचाट्यातून…
– जडेजाच्या जादूटोण्यामुळे रणजी ट्रॉफी फायनलमध्ये बंगालचा झाला पराभव? पहा व्हिडिओ