भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शिखर धवन याच्याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. धवन सध्या भारतासाठी फक्त एकदिवसीय प्रकारात खेळताना दिसत आहे. टी-20 आणि कसोटी संघांत मागच्या मोठ्या काळापासून त्याला संधी मिळाली नाहीये. शुक्रवारी (25 नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धवनने 77 चेंडूत 72 धावांची खेळी केली आणि शुबमन गिल याच्या साधीने पहिल्या विकेटसाठी 124 धावांची भागीदारी केली. एकदिवसीय संघासाठी धवन नेहमीच चांगले प्रदर्शन करत आला असला, तरी रवी शास्त्री यांच्या मते त्याला विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांच्या तुलनेत कमी प्रसिद्धी मिळली.
शिखर धवन (Shikhar Dhawan) एकदिवसीय क्रिकेटमध्ये मागच्या बऱ्याच दिवसांपासून जबरदस्त प्रदर्शन करत आहे. अशात रवी शास्त्री (Ravi Shastri) देखील धवनच्या या प्रदर्शनामुळे प्रभावित झाले आहे. सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय एकदिवसीय संघाचे नेतृत्व धवनच करत आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 7 विकेट्सच्या अंतराने जिंकला आहे. तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना रवी शास्त्रींनी एकीकडे धवन, तर दुसऱ्या बाजूला विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांना मिळणाऱ्या प्रसिद्धीची तुलना केली.
माध्यमांशी बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, “धवन खूप अनुभवी खेळाडू आहे. त्याला अपेक्षेप्रमाणे कौतुक आणि प्रशंसा मिळत नाही. खरे सांगायचे तर स्पॉटलाईट विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यावरच राहते. पण तुम्ही त्याची एकदिवसीय क्रिकेमधील आकडेवारी पाहिली तर काही खेळी अशा दिसतील, ज्यात त्याने बलाढ्य संघांविरुद्ध खेळताना मोठे विक्रम केले आहेत.” शास्त्रींच्या मते संघाकडे एखादा डावखुरा सलामीवीर फलंदाज असला, तर सामन्यावर त्याचा मोठा परिणाम होतो. धवनकडे दिग्गज गोलंदाजांचा सामना करण्यासाठी पुरेसा अनुभव आहे, असेही शास्त्रींना वाटते.
धवनच्या नेतृत्वात भारताने शुक्रवारी जिंकलेल्या सामन्याचा विचार केला, तर भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट्सच्या नुकसानावर 306 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाने हे लक्ष्य 47.1 षटकात 3 विकेट्सच्या नुकसानावर विजय मिळवला. दरम्यान, ही पहिली वेळ नाहीये, जेव्हा धवन भारताचे नेतृत्व करत आहे. यापूर्वी त्याच्या नेतृत्वात भारताने श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांच्याविरुद्ध खेळलेल्या मालिकां जिंकल्या आहेत. (Shikhar Dhawan didn’t get the praise he expected, but Rohit and Virat were always in the limelight said Ravi Shastri)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अरेरे! भारताने सामना गमावताच ट्विटरवर तिखट प्रतिक्रिया, नेटकरी म्हणाले, ‘हा भारत विराट आणि बुमराहशिवाय…’
आता सुट्टी नाही! उमरान मलिकने वनडेतील पहिल्या चेंडूपासून सुरू केली दहशद, वेगातील सातत्य मन जिंकणारे