---Advertisement---

असं काय झालं की शिखरच्या वडिलांनी सर्वांसमोर त्याच्या कानाखाली वाजवली, पाहा व्हिडिओ

On: बुधवार, जानेवारी 26, 2022 12:01 PM
Shikhar-Dhawan
---Advertisement---

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर संधी देण्यात आली होती. गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर असलेल्या शिखर धवनने या संधीचा पुरेपूर लाभ घेतला आणि संघासाठी मोलाचे योगदान दिले. या कामगिरीमुळे तो चर्चेत आला होता. परंतु, तो आता आणखी एका खास कारणासाठी चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Shikhar Dhawan viral video)

शिखर धवन हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याचे सोशल मीडियावर लाखो फोलोवर्स आहेत. त्यांचे मनोरंजन करण्यासाठी तो नेहमीच मजेशीर फोटो आणि व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत असतो. नुकताच शेअर केलेला व्हिडिओ देखील सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये शिखर धवन आपल्या वडिलांसोबत मस्ती करताना दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्या वडिलांनी त्याला कानाखाली देखील मारली आहे. हा एक मजेशीर व्हिडिओ आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ३ लाख लोकांनी लाईक केले आहे. तसेच ३ हजारपेक्षा अधिक लोकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, धवनचे वडील रूम मधून बाहेर येतात आणि विचारतात की, “तू आत जाऊन आला आहेस का?, यावर शिखर धवन म्हणतो की, “वॉरंट लाए? क्या सबुत है आपके पास?” यावर त्याचे वडील त्याच्या कानाखाली मारतात आणि म्हणतात, “चल अंदर और पोछा लगा.” यापूर्वी देखील शिखर धवनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

https://www.instagram.com/reel/CZJ6hevoRLb/?utm_medium=copy_link

शिखर धवनने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर देखील चांगली कामगिरी केली होती. संघातील इतर फलंदाज फ्लॉप ठरत असताना, शिखर धवनने डावाची सुरुवात करताना ३ पैकी दोन सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावले होते.

महत्वाच्या बातम्या :

शेवटच्या षटकात ३ षटकार अन् २ चौकारांनंतरही वेस्ट इंडिजचा १ धावेने पराभव, वाचा रोमांचक सामन्याबद्दल सविस्तर

या’ पंचांच्या डोक्यावर सजला ‘आयसीसी अंपायर ऑफ द इयर’चा ताज; भारत-द. आफ्रिका वनडे ठरलेला शतकी सामना

हे नक्की पाहा:

पुजाराला त्याचे वडिल एका गोष्टीपासून कायम वाचवत होते । story of Cheteshwar Pujara

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---