मुंबई । इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 13 वा हंगाम 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये सुरू होणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना 10 नोव्हेंबरला खेळला जाईल. स्पर्धेसाठी सर्व फ्रँचायझी संघ युएईत दाखल झाले आहेत. खेळाडू नेटवर जोरदार सराव करत असतानाच दुसरीकडे मजा करण्यातही ते फारसे मागे नाहीत. यावेळी, सर्व क्रिकेटर्स त्यांचे मजेशीर फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावरुन शेअर देखील करत आहेत. दरम्यान, दिल्लीचे दोन सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
धवन आणि शॉ ‘अपुन बोला तू मेरी लैला’ या गाण्यावर मजा करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना शिखर धवनने लिहिले की, ‘कोव्हिड काळातील माझी लैला पृथ्वी शॉ.’ खरं तर, यावेळी मुंबई इंडियन्स वगळता इतर कोणत्याही फ्रँचायझी संघात खेळाडूंचे कुटुंब नाही. दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू युएईमध्ये एकटेच आले आहेत. कोविड- १९ च्या साथीमुळे यंदा आयपीएल भारताबाहेर युएईमध्ये होत असून सर्व संघांना बायो- बबलमध्ये राहावे लागत आहे.
https://www.instagram.com/p/CEtgxbxjg35/?utm_source=ig_web_copy_link
‘जैव- सुरक्षित’ वातावरणामध्ये ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. शिखर धवनने गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल्ससाठी शानदार प्रदर्शन केले होते. त्याआधी तो फ्रँचायझी संघ सनरायझर्स हैदराबादकडून खेळत होता. 2010 मध्ये धवनने चमकदार कामगिरी केली आणि दिल्ली कॅपिटल्सची टीम प्लेऑफमध्ये पोहचली, त्यांच्याकडून पुन्हा एकदा अशाच प्रदर्शनाची अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-तब्बल १३ वर्ष कोहलीचं एकाच संघाकडून खेळण्याच कारणं आलं समोर, खुद्द कोहलीने सांगितलं…
-२ कोटी असो नाहीतर २० कोटी, भारतीय क्रिकेटरला कुंटूंबीय आयपीएलपेक्षा अधिक प्रिय
-फॅन्सच सोडा, १००-१०० मॅच खेळलेले क्रिकेटरच झाले धोनी फॅन, पहा व्हिडीओ
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२०: सीएसकेमध्ये हरभजन सिंगची जागा घेऊ शकतात हे ५ भारतीय क्रिकेटर्स
-वाढदिवस विशेष : कसोटी पदार्पणाच्या पहिल्या चेंडूवर बळी घेणारा प्रज्ञान ओझा
-आयपीएलचे सितारे : धोनीचा आदर्श घेतलेला झारखंडचा २२ वर्षीय विराट सिंग