fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बीसीसीआयचा एक नंबरचा ऑलराऊंडर आयपीएलमध्ये खेळणार भज्जीच्या जागी

Deep Dasgupta Selected Jalaj Saxena As Harbhajan Singh Option

September 6, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

गेल्या काही दिवसांपासून आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाला एकामागून एक झटके बसत आहेत. प्रथम २ खेळाडूंसह संघाचे एकूण १३ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले. अशात ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाने आयपीएलमधून माघार घेतली, तर आता फिरकीपटू हरभजन सिंगनेही वैयक्तिक कारणामुळे आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेत संघाला अजून एक मोठा झटका दिला आहे.

त्यामुळे आता हरभजनच्या गैरहजरीत संघाला त्याच्याजागी दुसरा पर्यायी खेळाडू शोधावा लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, हरभजनच्या जाण्यामुळे सीएसकेकडे केदार जाधवव्यतिरिक्त कोणताही भारतीय ऑफ स्पिन गोलंदाजी करणारा गोलंदाज उपलब्ध नाही.

अशात माजी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दीप दास गुप्ता यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना हरभजनच्या जागी खेळू शकणाऱ्या पर्यायी खेळाडूची निवड केली आहे. हा खेळाडू म्हणजे, देशांतर्गत क्रिकेटमधील शानदार अष्टपैलू खेळाडू जलज सक्सेना होय. Deep Dasgupta Selected Jalaj Saxena As Harbhajan Singh Option

सक्सेनाविषयी बोलताना दास गुप्ता म्हणाले, “मला वाटते की, सक्सेना हा सीएसकेत स्थान मिळवण्याचा दावेदार आहे. तो एक दमदार अष्टपैलू खेळाडू आहे. मला वाटते की, सीएसके त्याला आजमावू शकते. तो हरभजनच्या ठिकाणासाठी उत्तम पर्याय आहे. त्याला केवळ मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा नव्हे तर अमर्यादित षटकांच्या क्रिकेटचाही अनुभव आहे.”

देशांतर्गत क्रिकेटचा स्टार खेळाडू सक्सेना हा सलग ३ वर्षे बीसीसीआयचा अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू राहिला आहे. त्याने १३३ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यात त्याने १४ शतकांच्या मदतीने ६३३४ धावा केल्या आहेत. तर, ३४७ विकेट्सही घेतल्या आहेत. देशांतर्गत स्तरावरील टी२० क्रिकेटमध्ये त्याने ५४ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ४८ डावात फलंदाजी करत ६३३ धावा आणि ४६ डावात गोलंदाजी करत ४९ विकेट्स चटकावल्या आहेत.

तसेच सक्सेना हा आयपीएलच्या मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स या ३ संघाचा भाग होता. पण दुर्दैवाने त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. पण जर त्याला सीएसकेने हरभजनच्या जागी संघात स्थान दिले, तर त्यांना ऑफ स्पिन गोलंदाजीसह दमदार फलंदाजी करणारा खेळाडूही मिळेल. आणि सक्सेनाला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधीही मिळेल. त्यामुळे आता पाहणे उत्सुकतेचे ठरेल की, सीएसके सक्सेनाला संधी देईल का नाही?

महत्त्वाच्या बातम्या –

-फॅन्सच सोडा, १००-१०० मॅच खेळलेले क्रिकेटरच झाले धोनी फॅन, पहा व्हिडीओ

-शेर तो शेरच! कोरोनातही धोनीला आजही पहाण्यासाठी दुबईत चाहत्यांची गर्दी, पहा व्हिडीओ

-सचिन कर्णधार म्हणून ठरला फ्लाॅप, काँग्रेस नेत्याची सचिनवर खरमरीत टीका

ट्रेंडिंग लेख – 

-आयपीएलचे सितारे : धोनीचा आदर्श घेतलेला झारखंडचा २२ वर्षीय विराट सिंग

-आयपीएल २०२०: सीएसकेमध्ये हरभजन सिंगची जागा घेऊ शकतात हे ५ भारतीय क्रिकेटर्स

-आयपीएल २०२० मधून वेगवेगळ्या कारणाने माघार घेणाऱ्या खेळाडूंची संपुर्ण यादी


Previous Post

दिल्ली कॅपिटल्सच्या गब्बरला दुबईत मिळाली त्याची लैला, व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

Next Post

दुसऱ्यांच्या लीगमध्ये खेळण्यासाठी आपल्याच देशाच्या लीगमध्ये सहभागी होणार नाहीत हे क्रिकेटर

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

कर्णधारपद सांभाळण्यासाठी रिषभ पंत घेतोय दिल्ली संघातील ‘या’ खेळाडूंची मदत

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

‘काय करायचं, ही बॅटिंग लाईनअप संपतच नाही’, भारतीय दिग्गजाचा सीएसकेच्या संघाला पाहून सवाल

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘गब्बर’ची चेन्नईवर दादागिरी! धवनने घातली ‘या’ मोठ्या विक्रमला गवसणी

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला वादळी खेळीने घाम फोडणाऱ्या २१ वर्षीय पृथ्वी शॉने केली गिलची बरोबरी आता केवळ पंत आहे पुढे

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

लईच वाईट!! पहिल्याच सामन्यात एमएस धोनी क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

IPL2021: पृथ्वी शॉ आणि शिखर धवनची वादळी अर्धशतके; दिल्लीचा चेन्नईवर ७ विकेट्सने दणदणीत विजय

April 10, 2021
Next Post

दुसऱ्यांच्या लीगमध्ये खेळण्यासाठी आपल्याच देशाच्या लीगमध्ये सहभागी होणार नाहीत हे क्रिकेटर

मुंबई इंडियन्ससाठी आहे सर्वात मोठी गोड बातमी, एकहाती सामना फिरवणाऱ्या खेळाडूने...

असा टी२० क्रिकेटर होणे नाही, इंग्लंडच्या दिग्गजाची 'त्या' खेळाडूवर स्तुतीसुमने

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.