धडाकेबाज फलंदाज शिखर धवननं यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला. तो आयपीएलमधूनही निवृत्त झाला आहे. मात्र चाहत्यांना तो जगभरातील इतर लीगमध्ये खेळताना दिसेल.
निवृत्तीनंतर धवन लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळला होता. आता तो नेपाळ प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. सध्या या स्पर्धेचा पहिला हंगाम खेळला जात आहे. या लीगमध्ये धवन ‘कर्नाल याक्स’ संघाकडून खेळतोय. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात तो खास काही करू शकला नव्हता. मात्र दुसऱ्या सामन्यात त्यानं जबरदस्त खेळी खेळली.
शिखर धवननं दुसऱ्या सामन्यात 51 चेंडूत नाबाद 72 धावा ठोकल्या. आपल्या या खेळीत त्यानं 5 षटकार आणि 4 चौकार लगावले. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 141 एवढा राहिला. धवननं पहिल्या सामन्यात 14 चेंडूत 14 धावा केल्या होत्या. धवनच्या फलंदाजीच्या जोरावर कर्नाल याक्सनं 20 षटकांत 5 विकेट गमावून 149 धावा केल्या.
शिखर धवननं या सामन्यात 72 धावा केल्या. मात्र इतर सर्व फलंदाज अपयशी ठरले. त्याच्या व्यतिरिक्त अन्य एकही फलंदाज 25 धावांचा आकडाही गाठू शकला नाही. धवनही सुरुवातीला अडखळताना दिसला होता. त्याच्या पहिल्या 35 चेंडूत 33 धावाच झाल्या होत्या. मात्र एकदा खेळपट्टीवर जम बसल्यानंतर त्यानं फटकेबाजीला सुरुवात केली आणि संघाला सुस्थितीत आणून ठेवलं.
भारतासाठी दीर्घकाळ क्रिकेट खेळलेल्या शिखर धवननं यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. तो गेल्या बऱ्याच काळापासून टीम इंडियाबाहेर होता. त्यानं भारतासाठी 34 कसोटी, 167 एकदिवसीय आणि 68 टी20 सामने खेळले आहेत. धवनच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 24 शतकं आहेत.
हेही वाचा –
IND VS AUS; दुसऱ्या कसोटीपूर्वी WTC गुणतालिकेत पुन्हा फेरबदल, या संघाचा मोठा फायदा
रोहित शर्मा ओपनिंग करेल की सहाव्या क्रमांकावर खेळेल? आकडेवारी काय सांगते?
IND VS AUS; ॲडलेड कसोटीपू्र्वी फलंदाजी स्थितीच्या प्रश्नावर केएल राहुलचे धक्कादायक उत्तर